भारतात ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’ झालंय, ICMR च्या सदस्यांनीही केलं मान्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांच्या पुढे गेली आहे. देशात कोरोना व्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं आहे, असं भारतातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हा दावा करणाऱ्या ग्रुपमध्ये आयसीएमआर रिसर्च ग्रुपच्या दोन सदस्यांचाही समावेश आहे.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडेमिओलॉजिस्ट यांनी असं संयुक्त स्टेटमेंट दिलं आहे की, देशात मोठ्या प्रमाणात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे. या टप्प्यात कोरोना व्हायरसचा नाश होऊ शकतो, याची आशा करणं अवास्तव आहे. सरकारनं भारतात आतापर्यंत कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही असं वारंवार सरकारनं सांगितलं आहे. भारतात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत असताना 3 महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाऊन 1 जूनपासून टप्प्या टप्प्याने अनलॉक केला जाणार आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार, 25 मार्च 2020 ते 30 मे 2020 पर्यंत भारतात देशव्यापी लॉकडाऊन सर्वात कठोर होता तरी देखील देशात कोरोना प्रकरणं वाढली. प्रवासांच्या येण्याजाण्याने समस्या गुंतागुंतीची झाली आहे. या स्टेटमेंटवर हस्ताक्षर असलेल्यांमध्ये एम्सच्या कम्युनिटी मेडिसीन सेंटर्समधील प्राध्यापक डॉ. शशिकांत आणि बीएचयूच्या कम्युनिटी मेडिसीनचे माजी प्राध्यापक डॉ. डीसीएस रेड्डी यांचाही समावेश आहे. हे दोघेही कोरोना व्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या आयसीएमआरच्या रिसर्च ग्रुपमध्ये आहेत. डॉ. रेड्डी या ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like