ICRA | ऑगस्टमध्ये वाढली देशांतर्गत हवाई वाहतूक, झाली 31 टक्केची वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ICRA | क्रेडिट रेटिंग एजन्सी ICRA ने सोमवारी पत्रक जारी करत माहिती दिली की, ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत हवाई वाहतूकीत वाढ झाली आहे, जी मागील महिन्याच्या तुलनेत 31 टक्के वाढून 66 लाख झाली आहे. 2020 च्या ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत हवाई वाहतूक 51 लाख होती. मात्र, ऑगस्ट 2020मध्ये दरवर्षीच्या आधारावर देशांतर्गत हवाई वाहतुकीत 2.83 मिलियन प्रवाशांसह जवळपास 131 टक्केची वाढ झाली आहे.

ICRA नुसार मागील महिन्यात लागोपाठ सुधारणा होऊनही सध्या डिमांडमध्ये स्ट्रेस कायम आहे, ज्याचे मुख्य कारण कोविड महामारीची दुसरी लाट आहे.
या कारणामुळे लोक केवळ आवश्यकता असतानाच प्रवास करत आहेत.

ICRA च्या व्हाईस प्रेसिडेंट आणि को-ग्रुप हेड किंजल शाह यांच्यानुसार, विमान प्रवासाच्या मागणीत सुधारणा जारी आहे आणि ती ऑगस्टमध्ये जवळपास 30 ते 31 टक्केपर्यंत वाढून 65 ते 66 लाखाच्या आकड्यावर पोहचली आहे.
तर जुलै 2021 मध्ये ती जवळपास 50.1 लाखावर होती, जी जवळपास 131 टक्केची वार्षिक वाढ दर्शवते.

ऑगस्ट 2021 साठी एयरलाईन्सची कॅपासिटी डिप्लॉयमेंट जवळपास 57,500 डिपार्चर फ्लाईट्ससह सुमारे 99 टक्केपेक्षा जास्त होती.
तर ऑगस्ट 2020 मध्ये 28,834 फ्लाईट्स डिपार्चर झाले होते.

शाह यांच्यानुसार, ऑगस्ट 2021 च्यासाठी, सरासरी डेली डिपार्चर जवळपास 1,900 होते.
जे ऑगस्ट 2020 मध्ये जवळपास 900 च्या सरासरी आकड्यापेक्षा खूप जास्त होते.
जुलै 2021 मध्ये हा आकडा जवळपास 1,500 पेक्षा जास्त होता.

नागरी उड्डयन मंत्रालयाने देशांतर्गत मार्गांवर 25 मेपासून कॅपासिटी डिप्लॉयमेंट हळुहळु 33 टक्केपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.
कोविडच्या दुसर्‍या लाटेमुळे परमिसिबल कॅपासिटी डिप्लॉयमेंट 50 टक्केपर्यंत कमी केले होत.

 

Web Title : ICRA | domestic air passenger traffic increased by 31 percent in august icra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

OMG ! एकाच मुलासोबत लग्न करण्यासाठी आडून बसल्या दोन मुली, मग टॉस उडवून निवडली वधू!

Mukesh Ambani | RIL, Jio च्या मुकेश अंबानी यांचा नवा ‘विक्रम’ ! बनले पहिले भारतीय, ज्यांची संपत्ती 100 अरब डॉलरच्या पुढे

Narayan Rane | केंद्रीय मंत्री राणेंच्या वाहनावरील चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केला गंभीर आरोप