१ ऑक्टोबर पासुन महत्वाच्या कागदपत्रांना वेगळी ‘ओळख’, ICSI ने लॉन्च केलं UDIN

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला कोठे काही काम असेल तर तेथे कागदपत्रांची गरज असते. त्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. परंतू अनेकदा कागदपत्रे नसतील काम होण्यासाठी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला जातो. याच बनावट कागदपत्रांना रोखण्यासाठी आयसीएसआय कंपनीच्या सचिवांनी पुढाकार घेतला आहे.

खोट्या कागदपत्रांना आळा घालण्यासाठी आयसीएसआयने दस्तऐवजांना नवीन ओळख देण्याची घोषणा केली आहे. ज्याला युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर किंवा यूडीआयएन असे नाव देण्यात आले आहे. स्वयंसेवी आणि कंपनी सचिव यांच्या व्यवसायाला मजबुत करण्याच्या हेतूने आयसीएसआयने हा बदल केला आहे.

आयसीएसआयने या संदर्भात एक निवेदन जाहिर केले आहे. आयसीएसआयचे प्रेसिडेंट सी.एस. रंजीत पांडे यांना यूडीआयएन ची गरज असल्याचे सांगितलं आहे. या व्यवस्थेत कंपनी सचिवांनी देलेल्या कागदपत्रांना एक अल्फा-अंकीय संख्या दिली जाणार आहे. ई-फॉर्म सोडून कंपनी सचिवांनी दिलेल्या प्रमाणित केलेले कागदपत्रांसाठी १ ऑक्टोबर २०१९ पासून आयसीएसआयचा यूडीआयएन गरजेचे होणार आहे.

दरम्यान, या निर्णयाने खोट्या कागदपत्रांवर रोख लावता येणार आहे. आयसीएसआयनुसार यूडीआयएनद्वारे अटेस्टेशन आणि सर्टिफिकेशन सारख्या कामात रजिस्टर करणे सोपे होईल. तसंच याने चुकीचे अटेस्टेशन आणि सर्टिफिकेशनच्या बाबतीत खोटेपणा केला तर तो समोर येणार आहे. सर्टिफिकेशन आणि अटेस्टेशनच्या संख्येवर अटी ठेवून नियमांचे पालन करण्यास सांगितले जाणार आहे. यूडीआयएनमुळे स्टेकहोल्डर्स आणि रेग्युलेटर कंपनी सचिवांद्वारे हस्ताक्षर केलेली कागदपत्रे ही तपासता येणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी