‘या’ बँकेच होम लोन आणि पर्सनल लोन होणार स्वस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आयडीबीआय बँकेने एमसीएलआर संबंधी असलेले विविध कालावधीतील कर्जावरील व्याजदरात ०.०५ ते ०.१० टक्क्यांनी कपात केली आहे. ही कपात तत्काळ प्रभावातून केलेली आहे.

बँकेने एक वर्षाच्या कर्जावर एमसीएलआरला कमी करून ८. ९५ % केले आहे. एक वर्षाचा एमसीएलआर मानक दर आहे. यानुसार, वाहन, व्यक्तिगत तसेच घर कर्जाचे व्याजदर निश्चित केले जातात.

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या कपातीनंतर एक दिवस, एक महिना आणि सहा महिने यांसाठी व्याजदर अनुक्रमे ७.९० %, ८.१५%, ८.६० % इतके झाले आहेत.ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स ने मंगळवारी एक वर्षाच्या एमसीएलआरमध्ये ०.०५ % कपात केली होती. या कपातीनंतर एमसीएलआर ८.७ % झाली होती.

उल्लेखनीय आहे की RBI ने ६ जूनला द्विमासिक मौद्रिक नीति समीक्षामध्ये रेपो दर ०.२५ % कमी करत ५.७५ % केले होते. रेपो दरात कमी करण्याची या वर्षी ही सलग तिसरी संधी आहे. आतापर्यंत ०. ७५ % कपात करण्यात आली आहे.

MSLR’ म्हणजे काय?

‘मार्जिनल कॉस्ट ऑफ फण्डिंग बेस्ड लेंडिंग रेट’ अर्थात ‘एमसीएलआर’ बँकांनी जून २०१६पासून अनुसरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नेटवर्थवर मिळणारा परतावा आणि कर्जावर येणारा खर्च विचारात घेतला जातो. कर्जदारांना योग्य दरात कर्जे मिळावीत यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘एमसीएलआर’नुसार कर्जदर ठरवण्यास सर्व बँकांना सांगितले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

साखरेऐवजी गुळ टाकून घ्या चहा ; होतील ‘हे’ फायदे

मूळव्याधीचा त्रास होतोय ? घरच्या घरी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

फिट राहण्यासाठी दीपिकाचा नवीन फंडा

Loading...
You might also like