IDBI बँकेत भरती ! वार्षिक 45-60 लाखांचे पॅकेज, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्यांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. अशांना बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये नोकर भरती निघाली आहे. आयडीबीआय बँकेने चीफ डेटा ऑफिसर, डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर यासह अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार बँकेचे अधिकृत संकेतस्थळ idbibank.in च्या माध्यमातून अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे.

निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची नियुक्ती जाहिरातीमध्ये दिलेल्या शाखेसह इतर कोणत्याही शाखेत होऊ शकते. अर्ज करण्यापूर्वी माहिती आणि नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा.

पदाचे नाव आणि पदसंख्या

चीफ डेटा ऑफिसर – 1 पद
हेड-प्रोग्रामर मॅनेजमेंट अँड इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) – 1 पद
डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (चॅनल) – 1 पद
डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (डिजिटल) – 1 पद
चीफ इनफॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर – 1 पद
हेड- डिजिटल बँकिंग – 1 पद

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही मान्यता प्राप्त युनिवर्सिटीमधून MCA सह पदवी किंवा इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार चीफ डेटा ऑफिसर, हेड, डेप्युटी चीफ टेक्नॉलॉजी पदासाठी अर्ज करु शकतात. चीफ इनफॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर हेड डिजिटल बँकिंग पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारख्या संबंधित विषयांतून इंजिनिअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आवश्यक.

अर्ज कसा करायचा ?

पात्रता योग्य उमेदवारांनी बाँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अ‍ॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करुन भारावा. अर्ज केल्यानंतर ई-मेलच्या विषयात पदाचे नाव लिहावे. उमेदवारांनी आपला भरलेला अर्ज recruitment @idbi.co.in या ई-मेल आयडीवर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मे 2021 आहे.

वेतन

चीफ इनफॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर आणि हेड-डिजिटल बँकिंग ऑफिसर पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 50 ते 60 लाख रुपयांचे वार्षिक वेतन मिळेल. अन्य पदांसाठी वार्षिक पॅकेज 40 ते 45 लाख रुपये आहे.

नोटीफिकेशन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.idbibank.in/pdf/careers/Detailed-Advertisement-Expert-On-Contract-IT-CISCO-.pdf