‘या’ बँका देत आहेत FD वर ‘जास्त’ व्याज, येथे पहा यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लाइफ इन्शुरन्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीच्या मालकीची असलेल्या IDBI बँकेने आपल्या रिटेल डिपॉजिट दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने आपल्या दरांमध्ये ०.१५ टक्के ते ०.७५ टक्के इतकी कपात केली आहे. १९ जुलैपासून हे नवीन दर लागू झाले असून ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर ICICI ने आपल्या दरांमध्ये कपात केल्यानंतर आता बंधन बँकेने देखील कपात केली आहे. आर्थिक जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे बाजारात असलेल्या रोख रकमेची उत्तम स्थिती आणि रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात केलेल्या कपातीमुळे या तीनही बँकांनी हा निर्णय घेतल्याचे वाटते.

एफडीवर मिळणार जास्त व्याज

या निर्णयामुळे आता एफडीवर जास्त व्याज मिळणार असून  RBL बँक यापुढे आपल्या एफडीवर ७. ९ टक्के वार्षिक दर देणार आहे. जर तुम्ही १० हजार रुपयाची एफडी केली तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी १०, ८१४ रुपये मिळतील. त्याचबरोबर लक्ष्मी विलास बँकेत एका वर्षाच्या एफडीवर तुम्हाला ७.७५ टक्के व्याज मिळेल. त्यानंतर इंडसइंड बँक, साउथ इंडियन बँक आणि बंधन बँकेचा नंबर येतो. खासगी बँक  IDFC दोन वर्षाच्या एफडीसाठी ८.५ टक्के दर देत आहे. तर SBI सध्या ६.८ टक्के व्याजदर देत आहे.  त्याचबरोबर RBL बँक, AU स्मॉल फाइनेंस बँक, लक्ष्मी विलास बँक आणि इंडसइंड बँक दोन वर्षाच्या एफडीसाठी ७. ७५ ते ८ टक्के व्याजदर देत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like