‘या’ बँकेत नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेने केलं सावध राहण्याचं आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) यामध्ये नोकरीची संधी असल्याच्या चर्चा होत असल्याची माहिती पुढं आली आहे. मात्र IDBI बँकेला ही माहिती निदर्शनास आल्यानंतर बँकेने ग्राहकांना सावध राहण्यास सांगितलं आहे. तर IDBI बँकेत नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने लोकांची फसवणूक होत असल्याचंही बँकेने सांगितलं आहे. अशा सोशल माध्यमांवर एका खोट्या माहितीद्वारे नोकरी देण्याचे सांगून लोकांची फसवणूक केली जात आहे.

दरम्यान, आयडीबीआय बँकेने याचा खुलासा करत म्हटलं आहे की, नियुक्ती किंवा लोकांकडून पेसै घेण्यावरून कोणत्याही एजन्सीची सेवा घेतली जात नाही, असं बँकेनं नमूद केलं आहे. तसेच अशा खोट्या मेसेजेस बाबत सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. तर बँकेच्या नावाचा वापर करून फसवणूक करणाऱ्या काही व्यक्ती नेमणूक करणाऱ्या संस्था या IDBI बँकेच्या नावावर खोटी नियुक्ती पत्र देऊन नोकरी देण्याचं आश्वासन देत असल्याचे बँकेच्या लक्षात आल्याचं बँकेनं ट्वीटद्वारे स्पष्ट केलं आहे. पुढे बँकेने म्हटलं आहे, जर तुमच्याकडे असा कोणताही फोन आला तर तुम्ही अलर्ट राहा आणि पूर्ण तपास केल्यानंतरच पुढील पाऊल उचला, असंही बँकेनं म्हटलं आहे.

तसेच, लोकांना देण्यात येणाऱ्या नियुक्ती पत्रात बँकेचं नाव, लोगो आणि पत्त्याचाही वापर करण्यात आला आल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. तर त्यांनी आपल्या बाजूनं नियुक्ती आणि प्रशिक्षणासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क, कमिशन अथवा कोणतेसे पेसे आकारण्यासाठी कोणत्याही एजन्सीची किंवा व्यक्तीची नियुक्ती केली नाही. असे बँकेने म्हटले आहे. आणि बँकेत नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत काही लोकांना खोटे फोन कॉल येत असल्याचंही निदर्शनास आल्याचं बँकेनं सांगितले आहे. तसेच बँकेत कोणत्याही प्रकारची नियुक्ती करण्याचा निर्णय झाल्यास त्याची माहिती www.idbibank.in या वेबसाईटवर देण्यात येते असेही बँकेने नमूद केले आहे.

IDBI बँकेत नोकरी देण्याच्या नावावर कोणताही फोन आला तर लगेच बँकेच्या वेबसाईटवर जाऊन याची माहिती घेण्याचं आवाहन केलं आहे. IDBI ही LIC च्या नियंत्रणातील एक बँक आहे. नुकतंय या बँकेचं नियंत्रण देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या हाती देण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं IDBI बँकेला PCA मधून मोकळं केलं आहे. बँकेत काही आर्थिक सुधारणा दिसल्यानंतर बँकेला यातून मुक्त करण्यात आलं आहे. तर PCA म्हणजे कोणतीही बँक रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असते. या अंतर्गत बँकेला आपल्या कार्यात लगेच सुधारणा कराव्या लागतात. तसेच बँकेला नवी कर्ज देण्याचीही परवानगी नसते. अशी बँकेने पूर्णपणे माहिती दिली आहे.