IDBI Recruitment 2021 : आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, 1 कोटी रूपयांपर्यंतचं पॅकेज; जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – तुमच्यासाठी करोडपती होण्याची संधी आहे… पण तुम्ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ असाल तर… आयडीबीआय बँकेनं (IDBI) ही संधी दिली आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) अर्थात आयडीबीआय बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असून उद्योगक्षेत्राला (Industry) कर्ज पुरवठा करण्याच्या उद्देशानं १९६४ मध्ये या बँकेची स्थापना करण्यात आली. आयडीबीआय बँकेने माहिती तंत्रज्ञान (IT) प्रमुख पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी बँक वार्षिक एक कोटी रुपये इतके वेतन देत आहे. ही भरती करार (Contract) पद्धतीनं होणार असून, या पदाचा प्रारंभिक कार्यकाळ तीन वर्षांचा आहे. तो पाच वर्षांपर्यंत वाढवण्याची तरतूद आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून आहे. सध्याच्या काळात नोकरीची ही सुवर्णसंधी आयडीबीआय बँकेनं उपलब्ध केली आहे. तेव्हा पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी योग्य वेळी अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

अर्ज करण्यासाठी :

या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार १६ जून या अंतिम तारखेपर्यंत [email protected] वर अर्ज पाठवू शकतात.

कामाचा अनुभव :

या पदासाठी उमेदवाराकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामाचा २० वर्षांचा अनुभव असावा. त्यापैकी किमान १० वर्षे वरिष्ठ स्तरावर काम केलेले असावे. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थेच्या आयटी युनिटमध्ये प्रमुख जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिलं जाईल.

शैक्षणिक पात्रता :

अर्जदाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा अन्य संस्थेची अभियांत्रिकी शाखेतील (Engineering) पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा कॉम्प्यूटर अॅप्लिकेशनमधील पदव्युत्तर पदवी असावी.

वय :

या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा ४५ वर्षे आणि कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे आहे.

वार्षिक पॅकेज :

या पदासाठी बँक अंदाजित वार्षिक सीटीसी ८० लाख ते १ कोटी रुपये म्हणजेच १०० लाख रुपये वेतन देत आहे. आवश्यक पात्रतेचे निकष पूर्ण करणारे उमेदवार १६ जून २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी [email protected] वर अर्ज पाठवू शकतात.

पोस्टिंग :

या पदासाठी मुंबईत (Mumbai) पोस्टिंग होण्याची अधिक शक्यता आहे. मात्र बँकेच्या आवश्यकतेनुसार पोस्टिंग करण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे.

अधिक माहितीसाठी….

– बँकेच्या https://www.idbibank.in/index.asp वेबसाइटला भेट द्या.
– होम पेजवर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा
– त्यानंतर करंट ओपनिंगवर क्लिक करा
– Detailed Advertisement वर क्लिक करा.