दारुविक्रेतीची भयान आयडिया, चक्क देव्हाऱ्यामागे लपवला दारुसाठा

वर्धा : पोलीसनामा आॅनलाइन
दारु पिण्यासाठी दारुडे कोणत्याही थराला जावू शकतात हे सर्वांना माहित आहे. तसेच दारु विकणारे सुद्दा दारु लपवून विकण्यासाठी काय शक्कल घडवतील याचाही नेम नाही. वर्ध्यामध्ये अशीच एक भयान शक्कल महिला दारु विक्रेत्यानी लढवली. जी एेकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. या महिलेने दारुचा साठा चक्क देव्हाऱ्यामागे लपवला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a6a92c0a-c58f-11e8-8212-997e89936800′]

वर्धा हा दारुबंदी असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. वर्ध्यात एका गुप्त भुयारावर पोलीसांनी छापा मारला. यावेळी पोलीसांनी एका घरात दारुचा शोध घेण्यासाठी सर्व घर पालतं घातलं, तरिही त्यांना दारुचा एक थेंबही सापडला नाही. मात्र, त्यांनी जेव्हा देव्हाऱ्यातील देवी देवतांचे फोटो बाजूला काढले तेव्हा खरा चमत्कार झाला. पोलीसांना चक्क देव्हाऱ्यात दारुसाठा असेलेला आढळला.

[amazon_link asins=’B009ZBCZWQ,B01M0505SJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2fad8dd-c58f-11e8-9a3a-c7bb0eee908c’]

खरंतर अशा कलाकारांना मोठा पुरस्कारच द्यायला पाहिजे. पण हे तरी काय करणार ? शेवटी ती दारुचीच नशा. दारुसाठी वाट्टेल ते म्हणणारी ही माणसं आहेत.

वाळू माफियांचा पोलीसावर प्राणघातक हल्ला

जाहिरात.