IDFC FIRST Millennia Credit Card : रोख पैसे काढल्यावर व्याज लागणार नाही; जाणून घ्या इतर वैशिट्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- देशातील बहुतेक क्रेडिट कार्डवरून रोख पैसे काढण्यासाठी ग्राहकांना प्रचंड शुल्क द्यावे लागते. त्याचवेळी, IDFC FIRST बँक क्रेडिट कार्ड आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा देत आहे. IDFC बँकेकडे ४ प्रकारची क्रेडिट कार्ड आहेत आणि बँक आपल्या सर्व क्रेडिट धारकांना इंटरेस्ट फ्री कॅश अ‍ॅडव्हान्सची सुविधा देत आहे.

इंटरेस्ट फ्री कॅश अ‍ॅडव्हान्सची सुविधा
सहसा क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढल्यावर व्याज द्यावे लागते आणि प्रत्येक ट्रांजॅक्शनवर बँक २५० ते ४५० रुपये चार्ज लावते. यासोबत महिन्याचे व्याज २.५% पासून ३.५% वसूल केले जाते. तेच IDFC क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी कॅश ट्रांजॅक्शनवर फक्त २५० रुपये चार्ज घेते.

वार्षिक ९% व्याजावर क्रेडिट कार्ड
बँक ४ प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करत आहे, ज्यात महिन्याचे ०.७५ पासून २.९९% , म्हणजे ९ टक्क्यांपासून ते ३५.८८ टक्क्यांपर्यंत व्याज असेल. तथापि, ९ टक्के व्याज दराचा फायदा त्यांनाच मिळेल ज्यांचा क्रेडिट रेकॉर्ड चांगला असेल. या कार्डांची नावे आहेत- First Millennia Credit Card, FIRST Classic Credit Card, FIRST Select Credit Card आणि First Wealth Credit Card. सध्या आम्ही First Millennia Credit Card बद्धल बोलणार आहोत.

First Millennia Credit Card चे खास फीचर्स
>> सर्व ऑनलाईन खर्चावर 6X रिवोर्ड पॉइंट (रिवोर्ड रेट- १.५%)
>> सर्व ऑफलाईन खर्चावर 3X रिवोर्ड पॉइंट (रिवोर्ड रेट- ०.७५%)
>> वाढदिवसादिवशी सर्व खर्चावर 10X रिवोर्ड पॉइंट (रिवोर्ड रेट- २.५%)
>> २० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्चावर 10X रिवोर्ड पॉइंट ((रिवोर्ड रेट- २.५%)
>> फ्ल्यू, EMI, इंन्शोरन्स ट्रांजॅक्शन आणि कॅश विड्रॉलवर रिवोर्ड पॉइंट नाही.

रिवोर्ड पॉइंट कधीही कालबाह्य होणार नाही
First Millennia Credit Card चे सर्वात मोठे वैशिट्य म्हणजे रिवोर्ड पॉइंट कधीही कालबाह्य होणार नाही. म्हणजेच एका बिलिंग सायकलवर आपल्याला अमर्यादित बक्षिसे मिळू शकतात. हा रिवोर्ड पॉइंट कधीही कालबाह्य होणार नाही.

रिवोर्ड पॉइंटला रिडियम करण्याची गरज नाही
हे रिवोर्ड पॉइंट क्रेडिट कार्डच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातात. महत्वाची गोष्ट म्हणजे एका रिवोर्ड पॉइंटची किंमत १ रुपयाच्या बरोबर आहे.

First Millennia Credit Card चे चार्जेस
हे एक लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड आहे.
>>या कार्डची जॉइनिंग फी शून्य आहे.
>> या कार्डची वार्षिक फी शून्य आहे.