गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेत ‘हे’ १६ पोलिस कॉन्स्टेबल

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत पोलिसांच्या क्यूआरटी पथकाची गाडी भुसुरुंग स्फोट घडवून उडवून दिली. त्यात १५ पोलीस शहिद झाले. तर एका चालकाचाही मृत्यू झाला आहे. IED स्फोटके पेरून त्यांनी भ्याड हल्ला करत पोलिसांची गाडी उडवली.

आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याच्या कामासाठी असलेली २७ वाहने आणि कार्यालय नक्षलवाद्यांकडून जाळण्यात आले होते. दरम्यान पोलिसांच्या क्यूआरटीचे पथक या घटनास्थळाकडे जात असतानाच नक्षलींनी हा हल्ला घडवून आणला. त्यात शहीद झालेल्या जवानांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

दयानंद सहारे, अग्रमन रहाते, सर्जेराव खाडे, किशोर बोबटे, संतोष चव्हाण, राजू गायकवाड, लक्ष्मण कोडपे, साहुदास माडवी, नितिन घोरमारे, पुरणशाह डुगा, प्रमोद भोयर, तौफिक शेख, अमृत भदाडे, योगेश हलामी, भुपेश वलाटे, सोमेश्वर सिंहनाथ
(खासगी चालक, रा. कुरखेडा) अशी या हल्ल्यात मृत झालेल्या १६ जणांची नावे आहेत.