IEPFA | सरकारच्या ‘या’ निर्णयाने कोट्यवधी गुंतवणुकदारांना फायदा! आता जुन्या गुंतवणुकीवर क्लेम करणे होईल सोपे

नवी दिल्ली : IEPFA | गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPFA) अंतर्गत दावा निकाली काढण्याची प्रक्रिया सोपी बनवली आहे. आता कंपन्यांकडे पडलेली गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्याच्या प्रक्रियेत जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

 

सरकारच्या या निर्णयाने कोट्यावधी गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे. या प्रक्रियेंतर्गत आता नोटरीच्या सध्याच्या अवश्यकतेऐवजी कागदपत्रांच्या स्व-प्रमाणिकरणाची परवानगी दिली आहे. अर्थ मंत्रालयाने हे निर्देश शेयर, लाभांश आणि इतर प्रकारच्या गुंतवणुकदारांना दिलासा (IEPFA) देण्यासाठी जारी केले आहेत.

 

काय असते विना दाव्याची रक्कम

कंपनी नियमानुसार, माहिती देण्यात आली आहे की, ती रक्कम जिच्यावर 7 वर्षापर्यंत कोणाताही दावा केला जात नाही, ती शिक्षण आणि संरक्षण प्राधिकारणाला (IEPFA) हस्तांतरित केली जाते.

 

यामध्ये शेयर, गुंतवणुकदारांची रक्कम, लाभांश आणि इतर प्रकारच्या रक्कमेचा समावेश असतो.
ती परत मिळवण्यासाठी नोटरी प्रक्रियेतून जावे लागत होते, परंतु आता या निर्णयाने ही प्रक्रिया सोपी झाली आहे.

 

काय होईल लाभ

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशाप्रकारच्या निर्णयाने आता वेगाने दावे निकाली निघतील.
ज्याचा लाभ गुंतवणुकदारांना आणि गुंतवणुकदारांना आणि वारसांना थेट प्रकारे मिळेल.
यामुळे गुंतवणुकदार सुद्धा वाढतील. 1.29 कोटी शेयर धारकांचे दावे सध्या निकाली काढले गेले आहेत.

 

Web Title :- IEPFA | government decision will give benefit crores of investors now it will be easy to claim old investment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा