कामाची गोष्ट ! Aadhaar कार्ड हरवलंय अन् मोबाईल नंबर देखील रजिस्टर नाही ? ‘नो-टेन्शन’, ‘या’ 8 स्टेप्सनं पुन्हा मिळवा Online प्रिंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र असून त्याचा वापर अनेकदा करावा लागतो. यासाठी ते सतत खिशात ठेवावे लागते. आधार कार्ड तयार करताना मोबाइल नंबर, पत्ता अशी माहिती द्यावी लागते. परंतु, जर तुम्ही आधार कार्डसाठी मोबाइल नंबर दिलेला नसेल, म्हणजे आधार कार्डात मोबाइल नंबर रजिस्टर नसेल तरी सुद्धा तुम्ही दुसर्‍यांचा ऑनलाइन प्रिंट मिळवू शकता. पण हे लक्षात ठेवा की, कार्ड प्रिंट करण्यासाठी जो नवीन नंबर तुम्ही द्याल तो रजिस्टर होणार नाही. याबाबतची माहिती युआयडीएआयने आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. यात म्हटले आहे की, तुमचा मोबाइल नंबर आधारमध्ये रजिस्टर्ड नसेल तरी तुम्ही दुसर्‍यांदा आधार प्रिंट करू शकता.

मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसतानाही असे करा आधार रिप्रिंट

स्टेप 1 : सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता. : www.uidai.gov.in.

स्टेप 2 : आधार सेवा टॅबमध्ये Order Aadhaar Reprint (ऑर्डर आधार रीप्रिंट) वर क्लिक करा.

स्टेप 3 : यानंतर तुमच्या कम्प्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर किंवा 16 अंकांचा वर्च्युअल आयडी नंबर टाका. याच्या खालील कॉलममध्ये सिक्युरिटी कोड टाका.

स्टेप 4 : आता Mobile number is not Registered वर टिक करा. नंतर नवा मोबाइल नंबर देण्याचे ऑपशन मिळेल. तेथे नवा मोबाइल नंबर टाका. यानंतर एक ओटीपी येईल. या पर्यायात आधारची माहिती पाहणे आणि व्हेरिफाय करण्याचा पर्याय नसेल.

स्टेप 5 : आता नव्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी नोंदवा. नियम आणि अटी वाचा. सहमत म्हणून क्लिक करा.

स्टेप 6 : आता स्क्रीनवर नवे पेज उघडेल. जेथे 50 रुपये पेमेन्ट करावे लागेल. यासाठी पेमेन्ट मोड सिलेक्ट करावा लागेल. या 50 रूपयात स्पीड पोस्ट आणि जीएसटी दोन्ही आहे. पेमेन्ट करण्यासाठी युपीआय, डेबिट, क्रेडिट दोन्ही ऑपशन मिळतील.

स्टेप 7 : पेमेन्ट केल्यानंतर तुम्हाला याची स्लिप मिळेल, जी तुम्ही डाऊनलोड करा.

स्टेप 8 : पेमेन्ट केल्यानंतर तुमचे आधार कार्ड पुन्हा प्रिंट करण्यात येईल आणि 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल.