‘अल्लाह’कडून काठी चालली तर मोदींचा ‘घमंड’ राख करू : पाकचे परराष्ट्र मंत्री कुरेशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यानंतर आता पाकिस्तान कुरापती करण्याचा तयारीत आहे आणि विविध सेवा बंद करत आहे. तर अनेक बेताल वक्तत्व देखील करत आहे. पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की, अल्लाहच्या काठीचा आवाज येत नाही. जर असेच चालू राहिले. तर मोदी सरकारचा गर्व खाक होऊन जाईल.

कुरेशीने पाकिस्तानमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पाकिस्तानने काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा सयुंक्त राष्ट्रात नेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ते म्हणाले की, आपण मुद्दा उचलण्याआधीच आपला आवाज तेथे पोहचला पाहिजे. आपण जर एकत्र आलो नाही. तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही.

मोदींविरोधात आंदोलन करणार –

कुरेशीने सांगितले की, अनेक बेफिकिरीमुळे पाकिस्तानला या प्रकरणाने बरेच मागे टाकले आहे. आता पुढे पाऊल टाकण्याची वेळ आहे. जगाला कळाले पाहिजे की, काश्मीरींना काय वाटते. ज्या दिवशी मोदी संयुक्त राष्ट्राच्या आम सभेत जातील. तेव्हा काश्मीरी आणि पाकिस्तानी नागरिकांना संयुक्त राष्ट्राबाहेर आंदोलन करायचे आहे. जगभरातील आपल्या नातेवाईकांना सूचना कळवा. आपल्याला आवाज उठवायचा आहे. आपल्याला आपला लढा विविध मार्गांने लढावा लागेल.

भारताचा स्वातंत्र दिवस काळा दिवस म्हणून पाळा –

ते पुढे असे ही म्हणाले की, पाकिस्तानने आपला स्वातंत्र दिवस १४ ऑगस्ट काश्मीरबरोबर देखील जोडला आहे. भारताच्या स्वातंत्र दिवसाला आपण काळा दिवस पाळायचा. त्यांनी त्यांच्या नागरिकांना आवाहन केले आहे की, या काळ्या दिवसात उत्साहाने सहभागी व्हा. कुरेशी यांनी दावा केला की, काश्मीर प्रश्नी चीनचा पाठिंबा पाकिस्तानला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान सयुंक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य नाहीत. यामुळे तेथे चीन पाकिस्तानची बाजू मांडेल.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like