Coronaviurs : ‘कोरोना’मुळं शहीद झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना 1 कोटी देणार, CM अरविंद केजरीवाल यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसमुळे वातावरण गंभीर बनत चालले आहे. अशा परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. पोलीस आणि डॉक्टर्स, नर्स धोका पत्करून काम करीत आहेत. हे ओळखून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खूप महत्वपूर्ण घोषणा केली आहे. जर कोणी कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करीत असताना आपल्या जीवाला मुकला तर त्याच्या कुटुंबाला त्याने दिलेल्या सेवेसंदर्भात १ कोटी रुपये दिले जातील यात स्वच्छता कामगार, डॉक्टर किंवा परिचारिका यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ए एन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की , “स्वच्छता कामगार, डॉक्टर किंवा परिचारिका असो #COVID19 रूग्णांची सेवा करताना कुणी आपला जीव गमावला असेल तर त्यांच्या कुटूंबाला त्यांच्या सेवेसंदर्भात १ कोटी रुपये दिले जातील. ते खाजगी असो वा सरकारी क्षेत्रातील, काही फरक पडत नाही”

दिल्लीत इलाज करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू
ईशान्य दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमधील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने नोटीस चिटकवण्यात आली आहे. त्यात असे म्हटले गेले आहे की या मोहल्ला क्लिनिकमध्ये 12 ते 20 मार्च दरम्यान उपचार घेतलेले किंवा एखाद्याला चेकअपसाठी आणलेले सर्व लोक घरी स्वात:ला क्वॅरंटाईन करून घ्यावे. यावेळी कोणालाही काही अडचण असल्यास त्यांनी नोटीसमध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता असे नोटिशीत लिहण्यात आले आहे.

त्यानंतर आज एका कॅन्सर हॉस्पिटल मधील डॉक्टरना देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता काम करणाऱ्या व्यक्तींकरिता हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.