भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यास…, राष्ट्रवादीने राज्यपालांना दिला ‘मोठा’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेची तयारी आहे का ? असे पत्र राज्यापाल कोश्यारी यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन विचारणा केली आहे. यावर राष्ट्रवादीने राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांना मोठा इशारा दिला आहे.


राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपला 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेची संधी दिली आहे. भाजपची इच्छा आणि ताकद आहे का अशी विचारणा राज्यपालांनी केली आहे. राज्यपालांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. यासाठी भाजपची रविवारी (दि.10) कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलीक यांनी इशारा दिला आहे. भाजपने सत्तास्थापनेचा दावा केल्यास राष्ट्रवादी विरोधात मतदान करेल. सत्तास्थापनेची ही प्रक्रिया आधीच सुरु करता आली असती. तरीही राज्यापालांनी भाजपची तेवढी ताकद आहे का याची खातरजमा करणे गरजेचे होते. नाहीतर राज्यात घोडेबाजाराला उत यईल, असा इशारा दिला आहे. ही जबाबदारी राज्यपालांची असल्याचेही मलिक म्हणाले. तसेच भाजप बहुमत सिद्ध करु न शकल्यास राष्ट्रवादी पर्यायी सरकार देण्याचा प्रयत्न करेल असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like