BJP नं 1 हजार दिले तर आम्ही 5 हजार देऊ, पुण्याच्या मावळमध्ये आचारसंहिता भंगाचा FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन टीम – मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणुक आता रंगात आली असून त्यात एकमेकांवर आरोप होऊ लागले आहेत. मतदारांना पैसे देऊ असे जाहीर भांषणात सांगणाऱ्या पंकज गोपाळ तंरपाळे (रा. विकासनगर, ता़ हवेली) यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा देहुरोड पोलिसांनी दाखल केला आहे.

याप्रकरणी हवालदार ए एस नवले यांनी फिर्याद दिली आहे. मावळ मतदारसंघात राज्यमंत्री बाळा भेगडे विरुद्ध भाजपाचे बंडखोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनिल शेळके यांच्यात लढत होते आहे.

देहुरोड येथील विकासनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १२ ऑक्टोबरला जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत पंकज यांनी भाषण करताना आर्थिक देवाण घेवाण संदर्भात भाष्य केले आहे. त्याची खातरजमा करण्यासाठी लेखी अहवाल पोलिसांनी आचारसंहिता कार्यालयात पाठविला आहे.

या भाषणाची सीडी पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी ऐकली, त्यामध्ये पंकज यांनी जर बीजेपीने १ हजार रुपये दिले तर, राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुनिल शेळके हे आपणास ५ हजार रुपये देतील असे संभाषण केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी