असंच सुरू राहिल्यास भाजपाचं काँग्रेस होईल : महादेव जानकर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे हे पक्षप्रवेश असेच सुरु राहिल्यास येत्या काळात भाजपाचे देखील काँग्रेस होईल अशी टीका रासपचे अध्यक्ष आणि पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचे अस्तित्व उरलेले नाही. आमची राज्यात ताकद आहे. रासपचे राज्यात ९८ जिल्हा परिषद सदस्य, ४ नगराध्यक्ष, ३ सभापती, ६ उपसभापती, २ आमदार आहेत. त्यामुळे भाजपाकडे ५७ जागांची मागणी केली असल्याची माहिती जानकर यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

येत्या २५ ऑगस्टला मुंबईमध्ये रासपचा वर्धापन दिन होत आहे. या मेळाव्यासाठी दहा लाख कार्यकर्ते येतील असा विश्वास महादेव जानकर यांनी बोलून दाखवला. तसेच या कार्य़क्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like