…तर वाराणसीतून निवडणूक लढविन : प्रियंका गांधी

वायनाड : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघातून काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहिर केला नाही. मोदी यांच्या विरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. प्रियांका गांधी वाराणसीमधून निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी दिले आहेत. मात्र, प्रियांका गांधी यांनी वाराणसीमधून निवडणूक लढविण्यास आपल्याला संधी मिळाली तर आनंदच होईल असे म्हटले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी वायनाडमध्ये दोन दिवसांपासून आल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मला वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढविण्यास सांगितले, तर मला खूप आनंद होईल असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान काँग्रेसने वाराणसीमधून आपला उमेदवार जाहिर केला नसला तरी प्रियांका गांधी यांनी वाराणसीमधून लढावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रियांका गंधी यांना वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्षामध्ये विचार सुरू आहेत. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल अशा अन्य नावांचीही चर्चा सुरू आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यावद यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. वोधी पक्षांच्या संयुक्त उमेदवार म्हणून या नावाला संमती मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.