… अन्यथा ऐन १२ वी परीक्षेच्या काळात शिक्षकांचा असहकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्याची पूर्तता २० फेब्रुवारीपर्यंत केली नाही तर बारावीच्या परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिला आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.

महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या सोडविण्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. ‘महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं विविध मागण्यांसाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासोबत ३१ जानेवारी बैठक झाली. त्यात शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यासंबंधीचा शासन निर्णय दहा दिवसांत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आणि नाराजी आहे. येत्या २० तारखेपर्यंत सरकारने आश्वासनांची पूर्तता करावी अन्यथा ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात असहकार आंदोलन करण्यात येईल. ‘

काय आहेत मागण्या –

माहिती तंत्रज्ञान विषयास अनुदान देणे, २४ वर्षांच्या सेवेनंतर सर्व शिक्षकांना निवड श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांनाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे १० ,२० व ३० वर्षांच्या सेवेनंतर आश्वसित प्रगती योजना लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तातडीने आयोगाच्या शिफारशी लागू करणे या मागण्यांचा समावेश होता.

You might also like