धोनीने पुन्हा ‘ते’ ग्लोव्हज वापरले तर आयसीसी करू शकते धोनीवर ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियासाठी वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचपासून वादाला तोंड फुटले आहे. धोनीला बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज घालण्यास मनाई केल्यानंतर आता बीसीसीआयने यासाठी परवानगी मागितली आहे. त्यानंतर आता आयसीसी या प्रकरणात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान या सगळ्यात जर धोनीने पुन्हा हे ग्लोव्हज वापरले तर आयसीसी त्याच्यावर काय कारवाई करू शकते ते आपण पाहुयात. आयसीसीच्या नियमानुसार आयसीसी साधने आणि कपड्यांच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय सामन्यात राजकीय, धार्मिक किंवा जातीय संदेशाचे प्रदर्शन करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे धोनीला आता हा बलिदान बॅज असलेले ग्लोव्हज आंतरराष्ट्रीय सामन्यात घालता येणार नाहीत. मात्र तरी देखील बीसीसीआयने यासाठी परवानगी मागितली आहे. मात्र ‘जर एम.एस धोनी आणि बीसीसीआयने आयसीसीला हा विश्वास दिला की, हे चिन्ह राजकीय, धार्मिक किंवा टीका करणारं नाही, तर आयसीसी यावर विचार करु शकते.’

रविवारी ऑस्ट्रेलियाशी सामना

वर्ल्डकपमधील पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात आली. या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. या मॅचमध्ये धोनीने बलिदान मानचिन्ह असलेले ग्लोव्हज वापरले होते. त्यानंतर आयसीसीने यावर आक्षेप घेत धोनीला हे ग्लोव्हज वापरू नकोस असे सांगितले, त्यामुळे आता रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी ते ग्लोव्हज वापरतो कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र या सगळ्यात पहिल्यांदा आयसीसी समज देत असते, जर समज देऊन देखील धोनीने ते ग्लोव्हज वापरले तर त्याच्या सामन्यातील मानधनातून २५ टक्के रक्कम कट होऊ शकते. त्याचप्रमाणे दुसऱ्यांदा चूक केली तर ५० टक्के रक्कम कट होऊ शकते.

काय आहे हे बलिदान चिन्ह

धोनीनं आपल्या ग्लोव्ह्जला वापरलेले हे चिन्ह पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे हे विशेष बलिदान चिन्ह असतं. या चिन्हावर देवनागरी लिपीमध्ये ‘बलिदान’ असं लिहीलेलं असतं हे चिन्ह चांदीपासून बनवलेलं असतं. याआधी २०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीला भारतीय लष्करातर्फे मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. यासोबतच धोनीने पॅराट्रूपिंगचे प्रशिक्षण देखील घेतले आहे.