… तर राम मंदिराचा विषयही भाजपाला तारू शकत नाही, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही असे विधान भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी केले आहे. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. त्यावरून बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, ‘ देशातली आर्थिक स्थिती एवढी वाईट आहे की त्याचा फटका भाजपाला दिल्ली आणि झारखंडच्या निवडणुकीत बसणार आहे. अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही. परंतु पुढील काही दिवसांत चांगली धोरणं येताना दिसत नाहीत. मला असं वाटतं हे कठीण असलं तरी अशक्य नाही. दिल्ली आणि झारखंडमध्येही निवडणुका जिंकून आपण परिस्थिती बदलू शकतो. त्यासाठी दिल्लीत चांगला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा लागेल. ‘

अर्थव्यवस्थेवरील मंदीचे मळभ गेल्या काही महिन्यांपासून कायम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सलग सहाव्या तिमाहीत घसरण्याची भीती आघाडीच्या पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like