Coronavirus : सर्व काही ठीक राहिले तर भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट 2 आठवडयामध्ये होईल ‘नष्ट’ – तज्ज्ञ

नवी दिल्ली : भारतात आलेली कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा पीक आता गेला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आलेल्या या लाटेत एप्रिलच्या अखेरपर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे रोज समोर येत होती. परंतु 9 मे नंतर यामध्ये घसरणीचा कल दिसत आहे, जो या गोष्टीचा संकेत आहे की, लाट ओसरत आहे. या लाटेचा पीक आल्यानंतर अशी चर्चा सुद्धा होती की, अखेर ही लाट कधीपर्यंत राहील. या प्रश्नाचे उत्तर देताना सफदरजंग हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रोफेसर आणि हेड डॉक्टर जुगल किशोर यांनी सांगितले की, जर सर्वकाही ठीक झाले तर ही लाट कमाल 10 दिवसांपासून 2 आठवड्यांच्या दरम्यान संपेल.

मात्र, प्रोफेसर जुगल किशोर यांचे हे सुद्धा म्हणणे आहे की, भारतात दुसरी लाट संपणे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. यामध्ये सर्वात प्रमुख आहे, आपण कोविड नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे आणि व्हायरसला रोखण्यात आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांच्यानुसार, रस्त्यांवर लोकांची वर्दळ सुरू राहीली आणि बाजारात गर्दी वाढली तर दुसरी लाट संपण्याचा कालावधी सुद्धा तेवढ्याच वेगाने पुढे जाईल. जर आपण व्हॅक्सीनेशनमध्ये वेग आणला आणि जास्तीत जास्त लोकाना व्हॅक्सीन दिली तरी सुद्धा आपण या लाटेला वेळेवर संपवू शकतो. व्हॅक्सीन मिळाल्यानंतर हा व्हायरस रोखता येऊ शकतो.

डॉक्टर जुगल किशोर यांच्यानुसार, अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये जस-जशी घसरण येईल तस-तसा दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुद्धा थांबू लागेल. संसर्ग झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसानंतर याच्या संबंधीत समस्या दिसू लागतात. अशावेळी येणारे दहा दिवस अतिशय महत्वाचे असतात, हे केवळ रूग्णासाठीच नव्हे तर त्याच्या संपर्कात येणार्‍यांसाठी अतिशय महत्वाचे असतात. या दरम्यान जर कुणाला काही त्रास झाला नाही तर ती चांगली गोष्ट आहे.

अ‍ॅक्टिव्ह केस कमी होणे या गोष्टीचा पुरावा आहे की, आपले कॉन्टॅक्ट कमी होत आहेत, जे आपली कठोरता आणि नियमांचे पालन करण्यामुळे झाले आहे. त्यांचे हे सुद्धा म्हणणे आहे की, सध्याच्या काळात देशातील बहुतांश लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी काही औषधाच्या माध्यमातून आणि काही आपल्या स्ट्राँग इम्यूनिटीमुळे यातून बरे झाले आहेत. आपल्या स्ट्राँग इम्यूनिटीच्या बळावर बरे होणार्‍या लोकांच्या संपर्कात जे लोक आले असतील त्यांच्यापैकी काही असे असतील ज्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता जाणवू शकते.