IRCTC : ‘कनेक्टिंग’ प्रवासादरम्यान पहिली रेल्वे लेट झाल्यास तिकीटाचे पूर्ण पैसे परत !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रेल्वेचे देशभरात चांगलेच जाळे पसरले आहे. दररोज जवळपास १ कोटी ३० लाख लोक रेल्वेमधुन प्रवास करतात. भारतीय रेल्वेने देखील प्रवाशांना सुविधा देण्यासाठी वेगवेगळया योजना आणल्या आहेत. काही नियमांमध्ये बदल देखील करण्यात येत आहेत तर काही योजना आता चालु करण्यात येत आहेत. अलिकेडच रेल्वेने रेल्वे तिकीटाच्या बुकिंग आणि पीएनआर संबंधीत नियमांमध्ये बदल कले आहेत. नवीन नियमांनुसार ‘कनेक्टिंग’ प्रवासादरम्यान रेल्वेला लेट झाले तर प्रवाशांना तिकीटाची पूर्ण रक्‍कम परत मिळणार आहे.

नवीन नियमांनुसार रेल्वे चुकल्यास आपल्याला पैसे परत करण्याची पध्दत अधिक सोपी करण्यात आली आहे. म्हणजेच प्रवाशाने ‘कनेक्टिंग’ रेल्वेची तिकीट बुक केली असल्यास आणि ती रेल्वे सुटल्यास संबंधित प्रवाशाला त्याच्या तिकीटाची संपुर्ण रक्‍कम परत केली जाणार आहे. ज्यावेळी पहिली रेल्वे ‘कनेक्टिंग’ रेल्वे ज्या स्टेशनवरून सुटणार आहे त्या स्टेशनवर ठरलेल्या वेळेत पोहचली नसेल तरच तिकीटाची रक्‍कम परत मिळणार आहे. पहिली रेल्वे उशिरा पोहचल्यामुळेच प्रवाशाची ‘कनेक्टिंग’ रेल्वे सुटणार आणि त्यामुळेच त्याला तिकीटाची रक्‍कम परत मिळणार आहे. दरम्यान, भारतीय रेल्वेने दि. 1 एप्रिल पासुनच पीएनआर संबंधित एक नियम बदलला आहे.

Loading...
You might also like