जर गॅस सिलेंडर वेळेपुर्वीच संपलं तर LPG एजन्सीविरूध्द ‘इथं’ करू शकता तक्रार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एलजीपी सिलिंडर्स ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी केंद्र सरकारने ग्राहक फोरमची स्थापना केलीय. यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांतून दिलासादायक मिळणार आहे. कधी कधी एलजीपी सिलिंडर्समध्ये गॅस कमी असल्याच्या तक्रारी अनेक वेळा येतात. या प्रकरणात तक्रार करूनही एलपीजी एजन्सी ऑपरेटरवर कोणतीही कारवाई होत नाही. पण, असं होणार नाही. आपण ग्राहक फोरममध्ये गॅस सिलिंडर वेळेच्या आधी संपल्याची तक्रार करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

केंद्र सरकारने ग्राहक संरक्षण अधिनियम 201 9 मध्ये हे स्पष्ट केलंय की, जर कोणताही गॅस वितरक ग्राहकांच्या हक्कांची लूट करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नवीन कायद्यानुसार आता जर वितरकाने तक्रार करण्यापूर्वी एलपीजी सिलिंडरची मुदत संपल्यानंतर कोणतीही कार्यवाही केली नाही तर आपण थेट ग्राहक मंचात तक्रार दाखल करु शकता. एका महिन्यात, आपल्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे.

तर, एजन्सीचा परवाना रद्द होईल
ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतर ग्राहकांना कमी एलपीजी मिळाल्यास एलपीजी वितरकावर कारवाई केली जाणार आहे. यात काहीवेळा त्यांचा परवाना देखील रद्द होऊ शकतो.

ग्राहक गॅस सिलेंडरचे वजन तपासत नाहीत
बरेच ग्राहक डिलिव्हरी घेताना एलपीजी सिलिंडरचे वजन तपासून घेत नाहीत. एलपीजी देणारी व्यक्ती पुरवठा करताना वजनमाप यंत्र स्वत:जवळ ठेवत नाही. जर एखादा ग्राहक सिलिंडर तोलण्यासाठी दबाव आणत असेल तरच मशीन बाहेर काढून वजन मोजले जाते. अशाप्रकारे, दररोज हजारो ग्राहकांच्या घरी वजन न करता एलपीजी सिलिंडर पोहोच केले जातात. परंतु नव्या कायद्यामुळे अशा घटनांना आता आळा बसेल, असे वाटत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like