गडकिल्ले लग्न समारंभास भाड्याने देण्याच्या बाबतीत उदयनराजेंचा मोठा खुलासा

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरत सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी सरकारच्या या धोरणाचे समर्थन करणारे वक्तव्य करून सरकारला पाठिंबा दिला आहे.

उदयनराजे भोसले यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, गडकिल्ले भाड्याने उपलब्ध करून देण्याच्या धोरणावर माध्यमांनी चुकीचे वळण दिले आहे. मी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याशी यावर चर्चा केली असता त्यांनी सरकारचे धोरण नेमके काय आहे हे समजावून सांगितले. सरकारच्या धोरणामध्ये किल्ल्याचा काही भाग लग्न समारंभासाठी भाड्याने द्यावा असे म्हटले आहे. त्यामुळे मला यामध्ये काहीच चुकीचे वाटत नाही. त्याचप्रमाणे देवळात लग्न लावत नाहीत का ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देणार आहे. पर्यटनाला आणि हेरिटेज टुरिझमला चालना देण्यासाठी एमटीडीसीने राज्यातील 25 गडकिल्ल्यांची निवड केली आहे. निवड करण्यात आलेले गडकिल्ले 50 ते 60 वर्षे भाडेत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे किल्ले सोडून उर्वरीत किल्ल्यांचा विकास व्हावा यासाठी हे गडकिल्ले भाड्याने देण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती समोर आली आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी