हेमंत करकरे असते तर मी कधीच सुटलो असतो : समीर कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हेमंत करकरे असते तर मी कधीच सुटलो असतो, असे मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी समीर कुलकर्णी यांनी केले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भुमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी युपीए सरकारवर आरोप केले. युपीए सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवल्याचा गंभीर आरोप त्यांनी करून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान न करण्याचे आवाहन मतदारांना केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून अनेक राष्ट्रभक्तांना तरूंगात डांबले. त्यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार कले. मालेगाव बॉम्ब स्फोटात तरूंगात डांबलेल्या पाच जणांची पुराव्याअभावी निर्दोश मुक्तता करण्यात आली. त्यामुळे भारतीय समाजात धर्माच्या आधारे फूट पाडणाऱ्या या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्ताचे कर्तव्य आहे.

मालेगाव स्फोटानंतर तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हमेंत करकरे यांच्या पथकाने मला संशयीत म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर पाच दिवस माझ्यासह इतरांचीही कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा हेमंत करकरे मला म्हणाले होते की, तुमचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे दिसत आहे. पण तुमच्याशी या घटनेत कोणी संपर्कात आहे का याच्या चौकशीसाठी तुमची नार्को टेस्ट करावी लागेल. जर दोषारोपपत्रात काही आढळून न आल्यास तुमची सुटका केली जाईल असे करकरे यांनी अनामी रॉय यांच्यासमोर सांगितले होते. मात्र, त्याच दरम्यान मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि यामध्ये हेमंत करकरे शहिद झाले. हे देशासाठी आणि माझ्यासाठी मोठ दुर्दैव ठरल.