….तर इराणचा शेवट .. अमेरिकेची धमकी

वॉशिंग्टन – वृत्तसंस्था – इराण आणि अमेरिकेतील तणाव टोकाला गेल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर इऱाणला नष्ट करू अशी धमकीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिली आहे. इराणने अमेरिकेला धमकी देण्याची हिम्मत करू नये लढायचे असेल तर त्यांचा शेवट करू असा धमकीवजा इशारा त्यांनी इराणला दिला आहे.

इऱाणचे समर्थन असलेल्या सशस्त्र इऱाकी गटांकडून धोका असल्याने अनावश्यक राजनैतिक कर्माचारी वर्गाला इराक सोडण्यास सांगितले आहे. तर अमेरिकेने आखाताच्या समुद्रात युद्धनौका आणि बी-५२ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुढील काही दिवसांत तणाव आणखी वाढू शकतो.

बगदादच्या ग्रीन झोन हाऊसिंगमधील सरकारी कार्यालये आणि अमेरिकन दुतावासासह इतर दुतावासांवर रविवारी रॉकेट डागले गेले. तर हल्ल्यामागे नेमंक कोण आहे. ते स्पष्ट झाले नाही. दरम्यान डोनल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोलटॉन हे इराण विरोधात कठोर पाऊलं उचलण्याच्या मताचे आहेत ,तर इतर काही जण त्याला विरोध करत आहेत.

सौदी अरेबियाच्या दोन टॅंकरवर घातपाताच्या इराद्याने संयुक्त अरब अमिरातीच्या समुद्रामध्ये हल्ला करण्यात आला. या भागात अमेरिका आणि इराणचे संबंध बिघडलेले असताना आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. परुंतु इराणणे या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.