बिहारमधील विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला सोनू सूद

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठीच्या ‘नीट’ व ‘जेईई’ या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. मात्र सरकारने या परीक्षा नियोजित वेळेमध्येच घेण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. बिहारसारख्या राज्यांमध्ये पूर परिस्थिती असताना परीक्षा घेण्यात येत असल्याने परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहचायचे कसा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. मात्र आता नीट आणि जेईईची परीक्षा देणार्‍यांच्या मदतीला अभिनेता सोनू सूद धावून आला आहे.

बिहारमधील एका महिला पत्रकाराने विद्यार्थ्याचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बिहारमधील एक विद्यार्थी हतबलता सांगताना दिसत आहे. रडत रडत हा विद्यार्थी वडिलांनी सहा लाख रुपये कर्ज घेतले होते. घरात अन्नधान्य नसल्याने 25 हजार कर्ज काढले आहे. त्यातच परीक्षांच्या तारखेची घोषणा झाली असून परीक्षा केंद्र घरापासून खूपच लांब आहे. खासगी गाडीवाला 25 हजार रुपयांची मागणी करत आहे.

अशा परिस्थितीमध्ये परीक्षा पुढे ढकलावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. या विषयावर काहीतरी करा असे हा विद्यार्थी सांगताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओला सोनू सूदने रिट्विट करत विद्यार्थ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले आहे. जेईई आणि नीट परीक्षा झाल्याच तर बिहार, आसाम आणि गुजरातमधील पूरग्रस्त परिसरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. या विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रांपर्यंत पोहचवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करत आहे. केवळ सोय उपलब्ध नसल्याने परीक्षेला पोहचता आले नाही असे कोणाबरोबरही होऊ नये, असे सोनूने म्हटले आहे.