Pravin Darekar : ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी, शरद पवार यांनी त्यांच्या हाताखाली काम करावं ‘

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी पंतप्रधान व्हावे ही जनतेची इच्छा आहे, असे लिहिले होते. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे पंतप्रधान झाले तर मराठी माणूस म्हणून मला अभिमान असेल, असं म्हणत त्यासाठी संख्याबळ असावे लागते, असा टोला राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लगावला आहे.

Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या लेखावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमान आहे. मात्र, त्यासाठी संख्याबळ असावे लागते. तर सोनिया गांधी आणि शरद पवार हे उपपंतप्रधान होऊन हाताखाली काम करतील असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे. प्रवीण दरेकर हे बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे आमदार श्वेता महाले यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी हर्षल प्रधान यांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देत टोला लगावला.

Nana Patole : ‘मोदी सरकारच्या कारभाराने देश 15 वर्षे अधोगतीकडे गेला’

काय म्हणाले होते हर्षल प्रधान ?

हर्षल प्रधान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक करत म्हटले की, मुख्यमंत्री संवेदनशील आणि विनम्र नेत्यापैकी एक नेते आहेत. ते असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने जनतेसोबत संवाद साधत आहेत. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिमा केवळ जनतेच्या मनात नाही तर सर्वांच्यच मनात निर्माण केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा आहे.

 

Pune : नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणार्‍याला गुजरातच्या जेलमधून घेतलं ताब्यात, सायबर पोलिसांकडून अटक

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तसांत ‘कोरोना’चे 458 नवीन रुग्ण, 314 जणांना डिस्चार्ज

Pune : ‘प्रवासी सेवेबरोबर एक पाऊल पुढे टाकून पीएमपीची शहराला मदत’ – पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप