‘मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता, तरी ही वेळ आली नसती’ !

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मरकजचा कार्यक्रम आम्ही वेळेवर रोखला असता तर आज ही वेळ नसती. त्या कार्यक्रमामुळे देशभरात 30 टक्के विषाणूचा फैलाव अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती शनिवारी झाली. यावेळी आयोजित एका विशेष ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते.
शाह म्हणाले, दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये वर्षभर असे कार्यक्रम होत असतात. तो सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर मरकजच्या आतमध्ये होता. त्यामुळे मला वाटते की, जर आम्ही वेळेवर हा कार्यक्रम रोखला असता आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या असत्या तर कदाचित ही वेळ आली नसती. अनेक राज्यांमध्ये कोरोना योद्ध्यांवर हल्ले झाले आहेत. यावर बोलताना शाह म्हणाले, सरकार प्रत्येक योद्ध्यासोबत आहे.

देशभरात अशा 70 ते 80 घटना समोर आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी कठोर पावले उचलण्यात आली. भारतात आजवर जितकी संकट आणि महामारी आली आहे. त्याच्याशी सर्व सरकारांनी लढा दिला आहे. प्रत्येक वेळी सरकारांनी परिवर्तने आणली होती. मात्र, यावेळी संपूर्ण देशच याच्याशी लढत आहे. लोकांनी जनता कर्फ्यू, थाली वाजवून आणि करोना योद्ध्यांचा सन्मान करुन देशाला या महामारीविरोधात मजबूत केले. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पहिल्या लॉकडाउनवेळी अशा काही घटना घडल्या ज्यामुळे कोरोना विषाणूच्या केसेस वाढल्या. यामध्ये दिल्लतील मरकजच्या प्रकरणाचाही समावेश आहे.