महेंद्रसिंग धोनीला निरोप देण्याची तयारी सुरु ; लवकरच होणार निरोपाचा सामना ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघात मोठे बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याचबरॊबर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील जोर धरत आहेत. मात्र यासंदर्भात बीसीसीआय मोठ्या हालचाली करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महेंद्रसिंग धोनी हा वर्ल्डकप स्पर्धेनंतर निवृत्त होईल, असे बोलले जात होते, मात्र अजूनपर्यंत धोनीने याविषयी काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे तो इतक्यात निवृत्ती स्वीकारणार नाही. असे वाटत असतानाच बीसीसीआयच्या या गुप्त हालचालींमुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सूत्रांना दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंग धोनी याला निरोप देण्याची तयारी मंडळाने सुरु केली असून लवकरच बीसीसीआय याविषयी माहिती देईल. या वर्ल्डकप स्पर्धेत धोनीला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर आता तो पहिल्यासारखा सामना फिनिश देखील करू शकत नाही. त्यामुळे आता त्याला निरोप दिला जाणार आहे. याबाबत निवड समिती एमएसके प्रसाद हे धोनीशी चर्चा करणार असून जर त्याने निवृत्ती नाही घेतली. तर त्याला संघातून वगळण्यात येईल असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे त्याला टी- २० सामने देखील खेळू देणार नाही, असे समजत आहे.

धोनी पुढील वर्षीचा टी -२० वर्ल्डकप खेळेल असे बोलले जात होते. मात्र बीसीसीआय त्याला निवृत्त होण्यास भाग पाडत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. धोनीच्या वयाप्रमाणेच निवड समिती पुढील वर्ल्डकपच्या दृष्टीने विचार करून युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे धोनीने निवृत्त व्हावे असे सर्वांना वाटत आहे.

दरम्यान, हि माहिती समोर आल्यानंतर आता महेंद्रसिंग धोनी काय निर्णय घेतो. याकडे सर्व क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत देखील मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा याला एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. त्याचबरोबर विराट कोहली यांच्याकडे कसोटी सामन्यांचे कर्णधारपद तसेच ठेवले जाऊ शकते.

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like