पराभवाची हॅटट्रिक चुकवायची असेल तर राणेंनी विधानसभा लढवू नये : दिपक केसरकर

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा जुंपल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे नेते आणि गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंना हॅटट्रिक चुकवायची असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवू नये असे केसरकर यांनी सांगितले आहे. नितेश राणे यांनी नारायण राणे विधानसभेची निवडणूक कुडाळ – मालवण मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत असे सांगितले आहे. याच कारणाने शिवसेनेचे दिपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

राणेंनी रिक्स घेऊ नये –
केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्गचा इतिहास आहे की, एखादा नेता निवडणूक हरला तर तो कितीही मोठा नेता असू द्या तो पुन्हा निवडून येत नाही. त्यामुळे राणेंनी रिक्स घेऊन नये.

नारायण राणे दोन वेळा निवडणूक हरले आहेत. गेल्यान वेळी विधानसभेला कुडाळमधून हरले, तर पोटनिवडणूकीत वांद्रे मतदार संघातून देखील हरले. त्यामुळे आता जर त्यांना हॅटट्रिक चुकवायची असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक लढवू नये.

वैभव नाईक विजयी होतील –
नारायण राणे हे मोठे नेते आहेत, त्यांनी सर्वोच्च पदे भूषवली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी काय करायचे हा त्यांचा प्रश्न. परंतू मला वाटते शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक हे तरुण तडफदार नेते आहेत. त्यांचा संपर्क देखील चांगला आहे. ते निवडणूक येतील असे देखील केसरकरांनी सांगितले.

मुख्यमंत्री कोण होणार –
सध्या शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन चर्चा रंगली आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्याकडे सर्वच आशेने पाहत आहेत, ते भविष्यत मुख्यमंत्री असतील. त्यामुळेच ते जनतेत जाऊन आशिर्वाद घेत आहेत. मुख्यमंत्र्यांचा देखील दौरा होणार आहे. याचा फायदा युतीलो होईल यांची मला खात्री आहे. सेना भाजपची युती आहे. मुख्यमंत्री पदाबाबत कोणीही वक्तव्य करु नये असे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहेत. हा प्रश्न वरिष्ठांचा आहे. आम्ही तो आमच्या पद्धतीने सोडवू, असे दोघांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे इतर नेत्यांनी यावर बोलणे योग्य नाही.

आरोग्यविषयक वृत्त –