सावधान ! …नाही तर तुमचं बँक खातं केलं जाऊ शकतं ‘फ्रीज’, जप्त होणार मालमत्ता, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण वेळेवर जीएसटी रिटर्न फाइल करत नसाल तर आपल्याला ते महागात पडू शकतो. येत्या काळात तुम्ही जीएसटी रिटर्न भरला नाही तर जीएसटी अधिकारी तुमची संपत्ती किंवा बँक खाते जप्त करू शकतात. लवकरच वस्तू व सेवा कर (जीएसटी) संबंधीचे नियम अतिशय कठोर होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) जीएसटी पेमेंट्स वर एक स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रक्रिया ( SoP ) तयार केली आहे.
जीएसटी रिटर्नच्या नॉन फायलिंग संदर्भात घेतला मोठा निर्णय :
एका अहवालानुसार जर व्यापारी आपले जीएसटी रिटर्न भरत नसतील, तर त्यांची बँक खाती जप्त केली जाऊ शकतात किंवा त्यांची नोंदणी रद्द केली जाऊ शकते. वित्त मंत्रालयाने जीएसटी परतावा न भरण्यासाठी SoP भाग ठेवला आहे.
सुमारे 20% व्यापारी भरत नाहीत जीएसटी परतावा :
या अहवालात म्हटले आहे की, व्यापाऱ्यांना प्रत्येक महिन्याला (सामान्य पुरवठा) किंवा तीन महिन्यांनी (पुरवठा करणारे कंपोजिशन स्कीम) जीएसटी रिटर्न भरावा लागतो . दरम्यान, सुमारे 20 टक्के व्यापारी जीएसटी रिटर्न भरत नाहीत, ज्याचा परिणाम महसूल वसूलीवर होतो, म्हणूनच सीबीआयसीने जीएसटी पेमेंट चुकांबाबत सामना करण्यासाठी एसओपी तयार केला आहे.
नोटीसद्वारे दिली जाणार माहिती :
याअंतर्गत जर व्यावसायिकांनी तारखेपर्यंत जीएसटी रिटर्न भरला नाहीत तर त्यांना सिस्टमद्वारे जनरेट केलेली नोटीस पाठविली जाईल. येत्या पाच दिवसांत मंजुरी न मिळाल्यास पुढील नोटीस पाठविली जाईल, त्यानंतर 15 दिवसांची मुदत दिली जाईल.
व्यावसायिकांना त्यांची बाजू मांडण्याची दिली जाणार संधी :
जर आपण या 15 दिवसांत पैसे भरले नाहीत तर एखादा अधिकारी व्यावसायिकाची कर देयता तपासेल आणि त्यानंतर जीएसटी एएसएमटी 13 फॉर्म जीएसटीकडून त्यावरील परतावा परत मागेल. थकबाकी न भरल्यास हा फॉर्म मागे घेण्यात येईल. या कायद्यात असे म्हटले गेले की, निर्धारणास त्याची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, त्यानंतर केवळ नोंदणी रद्द करण्याचा विचार केला जाईल.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- झोपेत चालण्याच्या सवयीची ‘ही’ आहेत ४ कारणे, जाणून घ्या
- भारतात वेगाने वाढत आहे तणावाचा स्तर, ‘या’ ५ गोष्टी जाणून घ्या
- ‘सोरायसिस’बाबत ५ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या, असा आहे ‘हा’ आजार
- अंड्याच्या कवचाचे ‘हे’ १० फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?