कंगना राणावतनंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र आणि महाविकास सरकार आमने-सामने, गृहमंत्र्यांचा चौकशीचा पवित्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी आता अभिनेता विवेक ओबेरॉयचं नाव पुढे समोर आले आहे. पण अस असल तरी याचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स विभागाने अद्यापही त्याला चौकशीकरिता ताब्यात घेतल नाही. यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमने- सामने आले आहेत. केंद्र सरकारचा नार्टोटिक्स विभाग अभिनेता ओबेरॉयची ड्रग्ज प्रकरणी चौकशी करणार नसेल, तर मुंबई पोलीस ते स्वतंत्रपणे करतील, असा थेट पवित्रा ठाकरे सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विवेक ओबेरॉयची चौकशी झालीच पाहिजे असा पवित्रा घेतला आहे.

ड्रग्ज प्रकरणात ओबेरॉयच्या घरावरही धाड पडली होती. पण अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरु झाली नाही. गृहमंत्री अनिल देशमुख याबाबत म्हणाले की, विवेक ओबेरॉय यांच्याबद्दलची सगळी माहिती राज्य सरकारच्या वतीने दिली आहे. आता त्यांनी या प्रकरणी चौकशी करावी, अन्यथा मुंबई पोलीस ती करतील असे स्पष्ट बजावले आहे. ओबेरॉय हे भाजप संलग्न आहेत म्हणून एन सी बी त्याच्या कारवाईकडे दुर्क्ष करत असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वा हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणात आरोपी आहे. आदित्य हा कर्नाटकचे माजी मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून आदित्य गायब आहे. त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली आहे. तो विवेकच्या घरात असल्याची माहिती बंगळुरू पोलिसांना मिळाली. त्यामुळे बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. त्यांनी ओबेरॉयच्या घरात तपास सुरू केला

अल्वा हा विवेक ओबेरॉयचा नातेवाईक आणि त्याच्या घरी आहे, असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही त्याच्या तपासासाठी मुंबईत आलो आहोत. असं बंगळुरू पोलिसांनी सांगितलं.तेव्हापासून त्याच्या घरात तपास केला जात आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगनानंतर आता विवेक ओबेरॉयवरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आमने सामने येणार असं चित्र दिसत आहे.

You might also like