स्वस्तात राफेल विमाने मिळाली, तर आणखी का खरेदी केली नाहीत? : पी. चिदंबरम

करायकुडी : वृत्तसंस्था

राफेल लढाऊ जेट विमाने स्वस्तात मिळाल्याचा दावा भाजपप्रणीत एनडीए सरकार करीत आहे मग त्यांनी एवढी कमी विमाने खरेदी करण्याऐवजी जास्त संख्येने खरेदी करायला हवी होती मग तसे का करण्यात आले नाही, असा प्रश्न माजी अर्थमंत्री व केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी करून मोदी सरकारला विचारत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’42824e66-c5f7-11e8-bd5a-b146342bd4ef’]

पी. चिदंबरम यांनी करायकुडी, तामिळनाडु येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने १२६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला होता पण सध्याच्या सरकारने तो रद्द करून नवीन करार केला आहे. भाजपच्या दाव्यानुसार त्यांच्या सरकारने कमी किमतीत लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. ही विमाने स्वस्त कशी मिळाली हे सांगावे व जर स्वस्तात मिळाली, तर मग केवळ ३६ जेट विमानांऐवजी आणखी जास्त विमानांची खरेदी का करण्यात आली नाही हेही स्पष्ट करावे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना राफेल कराराची काहीही माहिती नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी राजवटीत तीन जणांनी संरक्षण खाते आतापर्यंत सांभाळले आहे. त्यांनी कुणीही योग्य प्रकारे काम केले नाही.

कर्जबाजारी आयएलएफएसवरून काँग्रेस व भाजपमध्ये पुन्हा जुंपली

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी सरकारने शस्त्रसुसज्ज राफेल विमाने यूपीएच्या किमतीपेक्षा वीस टक्के स्वस्त दरात खरेदी केल्याचा दावा केला आहे. २०१५ मध्ये संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी १२६ ऐवजी ३६ राफेल विमाने खरेदी करून १२६ विमाने खरेदी करण्याचा आधीचा करार रद्द केल्याचे जाहीर केले होते. फ्रान्सच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तत्कालीन अध्यक्षांच्या मते भारत सरकारने रिलायन्स डिफेन्सचे नाव भागीदार म्हणून सुचवले होते.

[amazon_link asins=’B078QM81SY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2cb7e2a1-c5f8-11e8-ab38-5980b4ba0bef’]