Post_Banner_Top

राज ठाकरेंनी आरोप सिद्ध केल्यास राजीनामा देईन : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाते असा आरोपी राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी हे सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन, असे खुलं आव्हान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले आहे. राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये नुकतीच सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारने महाराष्ट्रच पाणी गुजरातला दिल्याचा आरोप केला होता.

गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याच आरोपावरून खुलं आव्हान दिले आहे. गुजरातला पाणी जात हे राज ठाकरे यांनी सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन. याच बरोबर नुसतं बोलून चालणार नाही, तर स्वत:चं कर्तृव्य सिद्ध करून दाखवलं पाहिज. अन्यथा नुसत्या नकला करायच्या, क्लिप दाखवायच्या, तोडून-मोडून मोदीं विषयी काहीतरी बोलायचे. असे करण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या सुपाऱ्या घेण्यापेक्षा आपली माणसं निवडून आणून दाखवा, अशा शब्दात महाजन यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

राज ठाकरे यांच्या आरोपावर उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. आपल्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसऱ्याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती, असे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर टोला लगावला.

Loading...
You might also like