सावधान ! RTO च्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ‘जेल’ आणि २५,००० ‘दंड’, नवीन कायद्याला मंजुरी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी राज्यसभेत मोटार वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ मंजूर झाले. हे विधेयक सादर करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले केले की, देशात मागील पाच वर्षात रस्ते अपघातांमध्ये वाढ झाल्यामुळे रस्ते सुरक्षेच्या विद्यमान कायद्यात बदल करणे आवश्यक आहे. या आधी हे विधेयक २३ जुलै रोजी लोकसभेत मंजूर झाले आहे.

चालू कायदा अपयशी

बुधवारी हे विधेयक मांडताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सभागृहात दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना म्हटले की, विद्यमान ३० वर्षे जुना कायदा रस्ते अपघात थांबविण्यास आणि वाहतुकीची प्रक्रिया सुकर करण्यास सक्षम नाही. स्थायी समिती व निवड समितीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मांडण्यात आले आहे.

कायद्यातील महत्वाच्या तरतुदी

१) अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणे

सध्याच्या कायद्यात एक हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंतची शिक्षा आहे, परंतु नवीन कायदा-१९९ ए अंतर्गत गुन्हेगाराला २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.याशिवाय, बाल न्याय कायद्याविरोधात कारवाई केली जाईल.

२) हिट अँड रन प्रकरणी मृत्यू झाल्यास २ लाखाची भरपाई

जुन्या कायद्यात, अशा परिस्थितीत पीडित व्यक्ती जखमी झाल्यास आरोपी ड्रायव्हरला १२,५०० आणि जखमीचा मृत्यू झाल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. नवीन कायद्यात ही रक्कम अनुक्रमे ५० हजार आणि २ लाख करण्यात आली आहे. २०१८ मध्ये हिट अँड रनची सुमारे ५५ हजार प्रकरणे नोंदवली गेली, त्यामध्ये २२ हजाराहून अधिक लोकांचा जीव गमावला.

३) हेल्मेट नसल्यास हजार रुपये दंड

आतापर्यंत हेल्मेट न वापरणाऱ्यांना १०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता हेल्मेट न वापरणाऱ्यास १ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय वाहनचालकाचे लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे.

४) परवान्याशिवाय गाडी चालवल्यास ५ हजार दंड

परवाना नसताना गाडी चालवण्याचेही अनेक प्रकार उघडकीस आल्याने परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यांनाही या विधेयकात चाप लावण्यात आला आहे. आतापर्यंत परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास कलम १८१ अन्वये ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता दंडाची रक्कम ५ हजार करण्यात आली आहे.

५) गाडी चालवताना फोनवर बोलल्यास ५ हजार दंड

गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण करण्याचे अनेक प्रकारही उघडकीस आल्याने त्याचीही या विधेयकात गंभीर दखल घेण्यात आली आहे. गाडी चालवताना मोबाईलवर संभाषण केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत होता, आता ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

६) अयोग्य पद्धतीने रस्ता बांधल्यास १ लाख दंड

जुन्या कायद्यानुसार जर रस्ता अयोग्य पद्धतीने बांधलेल्या रस्त्यामुळे एखादा अपघात झाला असेल तर संबंधित कंत्राटदार किंवा कंपनीला त्यास थेट जबाबदार धरले जात नव्हते .परंतु आता या प्रकरणात एजन्सी किंवा कंत्राटदाराला प्रत्येक प्रकरणात एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

७) ४ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना सीट बेल्ट सक्तीचे

जुना कायदा अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत मौन बाळगतो, परंतु नवीन कायद्याच्या कलम १९४-बी अंतर्गत चार वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी कारमधील सीट बेल्ट सक्तीचे केले आहे. जर तसे झाले नाही तर वाहन मालकाला एक हजार रुपये द्यावे लागतील. हे दंड होईल जर मुल दुचाकीवर बसले असेल तर त्याला हेल्मेट घालावे लागेल.

८) रिकॉल ऑफ व्हेईकल

सध्याच्या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की केंद्र सरकार पर्यावरणाच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना परत बोलावू शकेल . आता नवीन कायद्याच्या कलम ११० ए आणि ११० बी मध्ये रिकॉल ऑफ व्हेईकलची पॉवर देण्याची तरतूद केंद्र सरकारला देण्यात आली आहे.

नव्या कायद्यानुसार दंड

रेसिंगवर – ५ हजार रुपये.

सीट बेल्ट – १ हजार रुपये

हेल्मेट – १ हजार रुपये.

जास्त वेग – २ ते ४ हजार रुपये प्रस्तावित आहेत.

धोकादायक वाहन चालविणे – ५ हजार रुपये

मद्यधुंद वाहन चालविणे – १० हजार रुपये दंड होऊ शकतो तसेच तुरुंगवासाची तरतूद.

 

आरोग्यविषयक वृत्त