शिवसेना सोबत आली नाही तर भाजपचा असेल ‘हा’ प्लॅन ‘B’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेनंतर आता सत्ता संघर्षात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आज झालेल्या भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली. राज्यात भाजप शिवसेना महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. भाजपची दारं 24 तास उघडी आहेत. आमच्या मनात कोणतीही शंका नाही असे पाटील म्हणाले.

सेनेकडून अद्याप प्रस्ताव नसल्याचे भाजपने म्हटलं असलं तरी जे लोकसभेआधी ठरलं तोच प्रस्ताव होता. त्यासाठी वेगळी लिखापडी करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे. एकीकडे भाजप युतीच्या सत्तेसाठी तयार आहे पण त्यात ते मुख्यमंत्री पदावर ठाम आहेत. दुसरीकडे सेनाही सत्तेसाठी तयार आहे आणि मुख्यमंत्री पदावर ते ठाम आहेत. आता सेनेकडून प्रस्ताव किंवा पुढाकार आला नाही तर मोठा पक्ष म्हणून भाजपचा काय प्लान बी असू शकतो याची सध्या चर्चा सुरु आहे.

असा असू शकतो भाजपचा प्लान ‘बी’
पडद्यामागे असणाऱ्या या स्पर्धेवर आता उघडपणे चर्चा सुरु आहे. सत्ता स्थापनेविषयी बोलताना शिवसेनेचे 45 आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपचे खासदार संजय काकडे यांनी केला होता. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी मंगळवारी खळबळजनक दावा करत शिवसेनेचे 45 आमदार भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करण्यास उत्सुक असल्याचे म्हटेल होते. काकडे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. काकडे म्हणाले होते की शिवसेनेच्या 56 पैकी 45 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्व आमदार आम्हाला फोन करत आहेत आणि सरकारमध्ये सहभागी होण्याची इच्छ व्यक्त करत असल्याचे काकडे म्हणाले.

Visit : Policenama.com