…तर युती तुटणार असल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत देखील युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. युती होणार हे निश्चित झाले असले तरी जागावाटपावरून युतीमध्ये फुट पडण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाही तर युती तुटण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. रावते यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीत युतीसाठी शिवसेनेने नाणार प्रकल्पावरून भाजपवर दबावतंत्र वापरले होते. त्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचे तसेच विधानसभेला शिवसेनेला 144 जागा देण्याचं आश्वासन भाजपने दिले होते. त्यामुळ जर शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे रावतेंनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. त्यामुळे भाजपला अधिक जागा हव्या आहेत. तसेच केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजप मजबूत स्थितीत आहे. त्यातच शिवसेनेने भाजप समोर 50-50 चा फॉर्म्युला ठेवला आहे. मात्र, भाजपला हे मान्य नसल्याने युतीचे काय होणार ? हा कळीचा प्रश्न झाला आहे.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like