.. तसे केल्यास फौजदारी कारवाई करू महापालिका उपायुक्तांचा ठेकेदारांना इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – थकित देयकावरून महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. विद्युत खांब व पथदिव्यांची बिले रखडल्याने विद्युत खांब व पत्नी वेळ काढून घेऊन असे पत्र ठेकेदारांनी महापालिका प्रशासनाला दिले होते त्यावर उपायुक्त प्रदीप पठारे यांनी विद्युत खांबासह पथदिवे काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाने सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये शहरासह उपनगरांत विद्युतीकरणाची १४४ कामे केली आहेत. सुमारे ४ कोटी रुपये खर्चून विद्युत खांबावर पथदिवे बसविण्यात आले. या कामांची बिले अद्याप तपासण्यात आली नाहीत. त्यामुळे ठेकेदारांना बिले मिळाली नाहीत. ही थकीत देयके मिळावी, या मागणीसाठी ठेकेदारांनी पथदिवे व विद्युत खांब काढून घेण्याबाबत महापालिकेला पत्र दिले.

त्यावर महापालिकेचे उपायुक्त पठारे यांनी ठेकेदारांना साहित्य काढून घेतल्यास कारवाई करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र दिले आहे. ही कामे घेताना पालिका व ठेकेदारांमध्ये करार झालेला आहे. या कराराचीही पठारे यांनी ठेकेदारांना आठवण करून दिली आहे. करारातील अटी-शर्तींचे अवलोकन करण्याची सूचना दिली आहे.

.म्हणून रखडली बिले
महापालिकेत पूर्णवेळ विद्युत अभियंता नाही. त्यामुळे विद्युतीकरणाच्या कामांची तपासणी झाली नाही. पूर्णवेळ विद्युत अभियंता मिळावा, यासाठी महापालिकेने नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिलेले आहे. परंतु, अद्याप विद्युत अभियंता पालिकेत हजर झालेले नाहीत. त्यामुळे ठेकेदारांची बिले थकली असून, विद्युत अभियंता हजर झाल्यानंतर बिले अदा करण्यात येतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

लहान मुलांचा ‘टिफिन’ देताना घ्या ही काळजी

सायनसवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही काळजी घेणे गरजेचे

‘हे’ उपाय केले तर चष्मा लागणार नाही, नंबर वाढणार नाही

सर्वच व्यायाम महिलांसाठी नसतात, जाणून घ्या कोणते व्यायाम करावेत