‘या’ 8 प्रकारे मृत्यु झाल्यास मिळणार नाही विम्याचा ‘क्लेम’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अनेकजण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘टर्म लाइफ इन्शुरन्स’ योजना खरेदी करतात. इतकेच नाही तर वेगवेगळ्या विमा कंपन्या ग्राहकांना अनेक ऑफर्स देऊन आपल्या पॉलिसी विकतात. परंतु हे देखील खरे आहे की या टर्म लाइफ इन्शुरन्स योजना बऱ्याच अटींसह असतात ज्यांकडे आपण बर्‍याचदा दुर्लक्ष करतो. किंवा कंपन्या या अटींबद्दल आपल्याला सांगतच नाहीत. कंपन्या पॉलिसीधारकाला आपल्या लाभाचे पैसे केव्हा आणि कोणत्या अटींवर देतात ते आधीच ठरलेले असते. जर पॉलिसीधारकाचा या ८ अटींनुसार मृत्यू झाला तर त्याला जीवन विमा पॉलिसी योजनेचे पैसे दिले जात नाहीत.

जाणून घेऊयात कंपनीच्या या ८ अटींविषयी :
१. दारूमुळे मृत्यू :
जर पॉलिसीधारकाचा दारू पिल्यामुळे मृत्यू झाला तर त्याला विम्याचा लाभ दिला जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी पॉलिसीधारकांना विमा हक्क देत नाही जे मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात आणि ड्रग्स सेवन करतात. जर पॉलिसीधारक योजना घेताना भारी मद्यपान करतात असा उल्लेख करत नसेल तर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कंपन्या विम्याचा लाभ देत नाहीत.

२. धूम्रपान करण्याच्या सवयीची माहिती लपविणे :
जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर टर्म प्लॅन घेताना कंपनीला त्याविषयी कळवा. धूम्रपान करणार्‍यांना सहसा आरोग्याचा त्रास होतो. जर पॉलिसीधारक कंपनीला हे सांगत नाहीत की ते जास्त धूम्रपान करतात आणि पॉलिसीधारकाचा धूम्रपान केल्यामुळे मृत्यू होतो, तर कंपनी विमा क्लेम करत नाही.

३. धोकादायक कार्यात सामील होणे :
जर एखादा पॉलिसीधारक साहसी आणि धोकादायक कार्यात सहभागी झाल्यामुळे मरण पावला तर कंपनी विमा दावा नाकारते. कारण हे असे उपक्रम आहेत ज्यात पॉलिसीधारक त्यांचा जीवन स्वतःहून धोक्यात घालतात.

४. एचआयव्ही आणि ड्रग ओव्हरडोस :
एचआयव्ही आणि ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू झालेल्या पॉलिसीधारकांना कंपनी विमा हक्काची परवानगी देत नाही. अनेकवेळा एचआयव्ही किंवा एड्ससारख्या शारीरिक आजाराच्या मृत्यूच्या वेळी कंपनीने विम्याचा दावा करण्यास नकार दिला आहे. यासह, जर एखाद्या पॉलिसीधारकाचा ड्रग ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला, तर कोणताही विम्याचा हक्क दिला जात नाही.

५. आत्महत्या :
जर पॉलिसीधारकाने आत्महत्या केली तरीही कंपनी विमा हक्क नाकारू शकते. मुदतीची योजना घेतल्या गेल्यानंतर पॉलिसीधारकाने एका वर्षाच्या आत आत्महत्या केल्यास नॉमिनीला विम्याचा हक्क मिळत नाही. तथापि बर्‍याच कंपन्या पॉलिसी खरेदीच्या तारखेच्या दुसर्‍या वर्षापासून आत्महत्येचे कव्हरेज प्रदान करतात.

६. बाळंतपणादरम्यान मृत्यू :
प्रसूती दरम्यान पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर कंपनी विमा हक्क देत नाही. माहितीनुसार, गर्भधारणेदरम्यान किंवा बाळंतपणादरम्यान मृत्यूवर विमा दावे क्लेम केले जात नाहीत.

७. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू :
भूकंप किंवा चक्रीवादळ इत्यादीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, दावा हक्क दिला जात नाही.

८. पॉलिसीधारकाचा खून :
जर पॉलिसीधारकाची हत्या केली गेली असेल आणि तपास केला असता एखाद्या गुन्ह्यात सहभागी होता असे सिद्ध झाले तर कंपनी त्याला पैसे देत नाही. म्हणजेच जर गुन्हेगारी कार्यात गुंतल्यामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर त्याला विम्याचा हक्क दिला जात नाही.

आरोग्यविषयक वृत्त –