‘कोणी छेड काढली तर त्याला खेचत पोलीस ठाण्यात आणण्याची धमक ठेवा’, ‘मर्दानी’नं दिला तरुणींना ‘सल्ला’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार राणी मुखर्जीनं नाशिकमधील तरुणींना मोलाचा सल्ला दिला आहे. तुमची कोणी छेड काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर तुटून पडा. त्याला अद्दल घडवा आणि खेचत पोलीस ठाण्यात आणण्याची धमक ठेवा असं राणी म्हणाली आहे. नाशिकमध्ये “say no to women violence” या महिला संदर्भातील परिसंवादाच्या कार्यक्रमात ती बोलत होती. यावेळी अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेते प्रविण तरडे यांच्यासह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हेही उपस्थित होते. मर्दानीप्रमाणे तरुणींनी धडाकेबाज व्हावं असंही राणीनं म्हटलं आहे.

यावेळी मुक्ता बर्वे म्हणाली, “मला कायदा कळत नाही परंतु हैद्राबाद घटनेनंतर पोलिसांनी जे केलं ते ऐकून मला आनंद झाला. सरकारकडून माझी जास्त काही अपेक्षा नाहीत.” असं ती म्हणाली. दरम्यान अभिनेते प्रविण तरडे म्हणाले, “सरकरानं शेतकऱ्यांची कर्ज माफी करण्यापेक्षा त्यांच्या जमिनी त्यांच्याकडेच राहतील याकडे लक्ष द्यायला हवं.” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले, “नाशिकमध्ये आता निर्भया सेलची स्थापना केली आहे. या माध्यमातून शहरातील महिला आणि तरुणींसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न नाशिक पोलीस करणार आहेत.” नायब राज्यापाल किरण बेदी यांनीही व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून नाशिक पोलिसांच्या अनोख्या उपक्रमाचं कौतुक केलं.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/