पावसाळ्यात पोटदुखीचा त्रास होतो ? करा ‘हे’ 5 सोपे घरगुती उपाय

पोलिसनामा ऑनलाइन – पावसाळ्यात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण या दिवसात आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असतात. दूषित पाण्यामुळं अनेकांना पोटाच्या समस्या उद्भवतात किंवा काहांनी जास्त प्रमाणात पोटदुखीचा त्रास होतो. आज आपण यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) पाणी पिताना उकळून, गाळून प्यायला हवं. पाणी थंड करून पिणं टाळायला हवं. बाहेरील पाणी पिताना ते स्वच्छ आहे याची खात्री करूनच प्यावं. गरम पाण्याचं सेवन केलं तर अनके फायदे होतात. वात कमी होऊन पोट दुखण्याचे प्रसंगही कमी होतात.

2) कोमट पाण्यात अर्ध लिंबू आणि पाव चमचा हिंग टाकून तर याचं सेवन केलं तर पोटदुखी थांबते.

3) जर जास्तच पोट दुखत असेल तर चमचाभर ओवा घेऊन तो चावून खावा. ओव्याचे पाणी पिण्यापेक्षा हा अधिक जास्त चांगला उपाय आहे.

4) बडीशेप हा देखील पोटदुखीवर चांगला उपाय आहे. भाजलेली बडीशेप खाल्यानंही आराम मिळतो.

5) लसणाच्या 4 पाकळ्या एक चमचाभर तुपात भाजून घ्या. यात एक लहान चमचा हिंग घाला. आता यात चिमूटभर मीठ टाका आणि याचं सेवन करा. यानंतर 20 मिनिट पाणी देखील पिऊ नका.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.