आता पाकिस्तानशी चर्चा फक्त PoK बाबतच : राजनाथ सिंह

पोलीसनामा ऑनलाइन – काश्मिरातील कलम ३७० रद्द कल्यानंतर भारत – पाकमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यातच पाकिस्तानला सगळ्या प्रयत्नांवर अपयशी व्हावे लागत आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या पुण्यतिथी निमित्त राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली होती. आज पुन्हा एकदा राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

हरियाणातील पंचकुला येथे बोलताना केंदीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, काही दिवसा अगोदरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारत बालाकोटपेक्षाही मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, असे विधान केले होते याचा अर्थ पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हे मान्य केले आहे की, भारताने बालाकोटमध्ये काय केले आहे.

त्यामुळे आता पाकिस्तानशी जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीर (पीओके) वर होईल. शिवाय जर गरज पडलीच तर बालाकोट एअर स्ट्राइकहूनही मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये येत्या काळात करू शकतो असा इशाराही राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला आहे.

काश्मीरच्या विकासासाठी हा निर्णय घेतला असल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले तसेच आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाक व्याप्त काश्मीरबाबतच होईल असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी पाकिस्तानला ठणकावून सांगिलते.

आरोग्यविषयक वृत्त –