‘उन्नाव’ बलात्कार प्रकरणातील पीडितेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यावर शरद पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हैद्राबादमधील रेप आणि मर्डरची घटना ताजी असतानाच उन्नावमधून अशीच एका धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वी घडलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपींनीच घटनेतील पीडितेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली आहे. सदर पीडितेवर आरोपींनी चाकूनं वार केले. नंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं. पीडिता 80 टक्के भाजली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी प्रश्न उपस्थित करत चिंता व्यक्त केली आहे.

शरद पवारांनी या संदर्भात कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. ट्विट करत शरद पवार म्हणाले की, “उन्नावमधील सामूहिक बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडित तरुणीला जिवंत जाळल्याची घटना ऐकून धक्का बसला. पीडिता सध्या मृत्यूशी झुंजत देत आहे. जर आरोपींना वेळीच अटक केली असती तर ही घटना घडली नसती. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तातडीनं कारवाई करायला हवी.” असं पवारांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं ?

उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता पहाटे 4 वाजता रायबरेलीला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी बैसवारा बिहार रेल्वे स्टेशनला जात होती. यावेळी या घटनेतील आरोपींनी अचानक तिच्यावर हल्ला केला. सदर पीडितेच्या डोक्यावर काठीनं प्रहार करण्यात आला. यानंतर ती खाली कोसळली. आरोपींनी तिला पेट्रोल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. चाकून तिच्यावर वारही केले. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. शरद पवारांनीही चिंता व्यक्त केली आहे.