आई आणि बायकोला विक आणि पैसे भर- आरबीएल बँकेच्या महिला अधिकाऱ्यांचे संतापजनक वक्तव्य

कोल्हापूरः पोलीसनामा आॅनलाईन

आर बी एल बँकेतील अधिकाऱ्यांनी क्रेडिट कार्ड च्या कर्ज वसुलीसाठी कर्जदारावर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा ऑडिओ सध्या WHATS APP वर व्हायरल झाला आहे. कोल्हापुरातील श्रेयस पोतदार यांनी आर बी एल बँकेकडून घेतलेल्या क्रेडिट कार्डच्या कर्जाची वसुली करताना कर्ज फेडता येत नसेल तर तुझ्या आईला आणि बायकोला विकून कर्ज फेड असा अजब सल्ला बँकेच्या महिला वसुली अधिकाऱ्यांनी दिला आहे. हे प्रकरण २४ एप्रिल २०१८ रोजीचे असून हा ऑडिओ आज सकाळ पासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या संदर्भात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापुरातील सोन्याचे व्यापारी श्रेयस पोतदार यांनी आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड घेतलं होतं. गेल्या 3 वर्षा पासून ते या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत आहेत. गेल्या सात महिन्यांपूर्वी व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांचे क्रेडिट कार्डचे चार महिन्याचे पैसे थकले होते. या पैशाच्या वसुलीसाठी आरबीएल बँकेच्या महिला वसुली अधिकाऱ्यांनी  श्रेयस पोतदार यांचे कडे तगादा लावला. पैसे फेडता येत नसेल तर तुझ्या आईला आणि बायकोला मुंबईला पाठवून कर्ज फेड असा अजब सल्ला बँकेच्या महिला वसुली अधिकाऱ्यांनी दिला आहे.

एवढ्यावरच या महिला अधिकारी थांबल्या नाहीत तर त्यांनी फेसबुक द्वारे पोतदार यांच्या नातेवाईक आणि मित्रांना संपर्क साधून त्यांनी पोतदार यांची पत्नी आणि आई याची बदनामी सुरू केली होती. या बाबत आम्ही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पण त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया या बाबत देण्यात आली नाही..