‘जॉब’ बदलताना ‘हे’ काम न केल्यास ‘EPF’ ची रक्कम होणार नाही ट्रान्सफर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेकदा कर्मचारी आपली नोकरी बदलताना काही बाबींकडे दुर्लक्ष करतात, ज्यानंतर त्यांना अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या असते ती EPFO अकाऊंट संबंधित. जर तुम्ही कंपनी सोडताना काही प्रक्रियांचे पालन केले नाहीत तर तुम्हाला ईपीएफचे पैसे ट्रान्सफर करताना किंवा काढताना समस्या उद्भवू शकते. अशात तुम्ही ईपीएफ अकाऊंटवर लॉग इन देखील करु शकत नाही.

उदाहरणार्थ, एखादा कर्मचारी आयटी कंपनीत काम करत असेल आणि त्याने दुसरी एक कंपनी जाॅइन करण्याचा निर्णय घेतला, कंपनीला त्याला 10 दिवसात जाॅइनिंग सांगितली, यानंतर त्या कर्मचाऱ्याने सध्याची कंपनी सोडून नवी कंपनी जाॅइन केली. परंतू यानंतर तुम्हाला ईपीएफ अकाऊंटशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आता तुम्ही ना की तुमचे पैसे ट्रांन्सफर करु शकत ना की काढू शकत. एवढेच नाही तर तुम्ही ईपीएफ अकाऊंटवर लॉगइन देखील करु शकणार नाही. या समस्या उद्भवतात कारण नोकरी सोडताना योग्य प्रक्रियेचे पालन करण्यात येत नाही. आता तुम्ही तुमच्या पर्सनल डिटेलवरुन लॉन इन करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला लॉग इन करता येणार नाही.

याला कारण आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ रेकॉर्डमध्ये मागील कंपनीने एक्सिट डेट टाकली नव्हती. ईपीएफओच्या नियमानुसार जोपर्यंत कर्मचारी नोकरी सोडत नाही, तो पर्यंत कर्मचारी आपल्या ईपीएफ मधील पैशांचा वापर करु शकत नाही. त्यासाठी कर्मचाऱ्याला ईपीएफओ कार्यालयातून सांगण्यात येत की कर्मचाऱ्याने आपल्या आधीच्या कंपनीतून ईपीएफ अकाऊंटवर डेट ऑफ एक्सिटची डिटेल भरुन घ्यावी. तसेच आपला पर्सनल मोबाइल नंबर ईपीएफओकडे अपडेट करावे.

आता कर्मचाऱ्याला आपल्या जुन्या कंपनीत जाण्याशिवाय पर्याय नसतो. आता जुन्या कंपनीतून कर्मचाऱ्याला नोटीस पिरियड देण्यात आला नाही म्हणून एक महिन्याचा पगार जमा करुन घेण्यात येऊ शकतो. कारण कंपनी आपल्या अपॉइमेंट लेटरवर ही अट टाकत असते. आता कर्मचाऱ्याला नाईलाजास्तव आपल्या जुन्या कंपनीत एक महिन्याचा पगार जमा करावा लागतो. यानंतर कर्मचाऱ्याच्या ईपीएफओमध्ये डेट ऑफ एक्सिटची माहिती देण्यात येईल. त्यानंतर नव्या कंपनीशी कर्मचाऱ्याचे खाते जोडता येईल. यामुळे अशा समस्येतून वाचण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यापासून दूर राहू नका. अन्यथा तुम्हाला समस्या उद्भवू शकतात.

visit : Policenama.com