रेल्वे तिकिट रद्द केल्यास मिळणार रिफंड ; मात्र ‘हे’ नियम लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही रेल्वेने प्रवास करता ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रेल्वे तिकिट काही कारणामुळे रद्द केल्यास त्याचे रिफंड तुम्हाला मिळू शकणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागणार आहेत. तिकिट रद्द करण्याची सुविधा आयआरसीटीकडून देण्यात येते.

ट्रेनचे तिकिट तुम्ही रिझर्वेशन काउंटर येथून रद्द करु शकता. परंतु जर तुम्ही ऑनलाईन तिकिट खरेदी केले असल्यास आयआरसीटीच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेले तिकिट रद्द करु शकणार आहात. मात्र त्यासाठी तुम्हाला काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत.

तिकिट रद्द करण्यासाठी हे नियम जरुर लक्षात ठेवा –

RAC तिकिट ट्रेन निघण्यापूर्वी ३० मिनिटे आधी रद्द करु शकता. ई-आरएसी तिकिट असून त्याचासाठी पत्रक बनवण्यात आले आहे. त्यामध्ये रिफंड मिळण्यासाठी ऑनलाईन टीडीआर भरावा लागतो.

1 एप्रिलपासून जेवण बनवणं अन् गाडी चालवणं होणार महाग 

जर ट्रेनच्या वेळेपूर्वी ४८ तासांपासून ते १२ तासांपूर्वी तुम्ही तिकिट रद्द करत असाल तर तुम्हाला २५ टक्के रद्द शुल्क लावण्यात येतो.

ट्रेनच्या निर्धारित प्रस्थानापासून १२ तासांपेक्षा कमी आणि चार तास पूर्वी तिकिट रद्द केल्यास तिकिटावरील ५० टक्के रक्कम रद्द केल्याचे घेतले जातात.

IRCTC आरक्षित तत्काळ तिकिट रद्द केल्यास त्याचे पैसे रिफंड म्हणून देण्यात येत नाहीत. आयआरसीटीसी यांच्या वेबसाईटनुसार( irctc.co.in ) आकस्मिक तिकिट आणि प्रतिक्षा सूचीसाठी तत्काळ तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वे नियमांनुसार शुल्क घेतले जातात.