तुमच्याकडं 786 नंबरची नोट असेल तर सोन्याहून पिवळं, दिवाळीपुर्वीच बनाल लखपती !

पोलीसनामा ऑनलाइन – जर तुमच्याकडे नोटा आणि नाण्याचं मोठं कलेक्शन असेल तर तुम्ही या दिवाळीत लखपती बनू शकता. जर तुमच्याकडे असणाऱ्या नोटांमध्ये 786 नंबर सीरिजची नोट असेल तर तुम्ही 3 लाखांपर्यंत रक्कम जिंकू शकता. यासाठी तुम्हाला ईबे (https://www.ebay.com/) या वेबसाईटवर जावं लागणार आहे. यावर तुम्हाला नोटेच्या बदल्यात पैसे मिळतील.

ई-बे (ebay) वर कशी लावली जाते बोली ?
ई-बे वर विविध गोष्टींची बोली लावली जाते. यात नोटांचाही समावेश आहे. या बोलीत कोणीही भाग घेऊ शकतं. ज्याच्याकडं 786 नंबरची नोट आहे त्याला या बोलीत 3 लाखांपर्यंत रक्कम मिळू शकते. 786 नंबरला खूप महत्त्व आहे.

1951 मध्ये छापलेली नोट 1 लाखांत
जर तुमच्याकडे 10 रुपयांची जुनी आणि 1951 मध्ये छापली गेलेल नोट असेल तर तिला लाखांमध्ये किंमत आहे. ही नोट पांढऱ्या आणि फेंट निळ्या रंगात आहे. जर ही नोट तुमच्याकडे असेल तर तिला 1 लाख रुपयांची किंमत मिळेल. खूप जुन्या नोटा असल्यानं या नोटा दुर्मिळ असल्याचं मानलं जातं.

किती जुनी नाणी संग्रहित ?
अमरावतीच्या एका प्रतिष्ठीत कुटुंबाकडे इतिहासकालीन नाणी आहेत. त्यांच्याकडे असलेली ही पारंपरिक वडिलोपार्जित नाणी फक्त लक्ष्मीपूजनालाच बाहेर काढली जातात. इतर वेळी ही नाणी तिजोरीत बंद ठेवली जातात. यातील एक नाणं 698 वर्षांपूर्वीचं आहे. हे नाणं निजामशाहीतील असून त्यावर सन 1322 असं अंकित आहे. हे निजामशाहीतील चांदीचं एक रुपयांचं नाणं 1321 मध्ये जारी करण्यात आलं होतं. याच्या एका बाजूला मक्का येथील मशिदीचं तर समोरील बाजूला मिनारचं चिन्ह आहे. या मिनारच्या चारही बाजूला अरबी भाषेतील मजकूर आहे. परंतु शहरात कोणालाही अरबी भाषा अवगत नसल्यानं या लिखाणाचा अर्थ कळू शकलेला नाही.

त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण 16 नाण्यांमध्ये निजामशाहीतील एका नाण्यासह 2 नाणी 1840 मधील व्हिक्टोरिया राणीचा ठसा असलेली आहेत. एक नाणं 1882 मधील इंडियन पोर्तुगीज रुपयाचं आहे. 8 नाणी ही 1913, 1944, 1947 ची ब्रिटीशकालीन जॉर्ज फोर्थ, जॉर्ज फिप्थ यांच्या कार्यकाळातील एक रुपयाची चांदीची नाणी आहेत. तसंच सन 1939, 1943,1944 मधील 8 आठआणे, एक आणा अशी ऐतिहासिक नाणी आहेत. ही नाणी वडिलोपार्जित पूजेत असल्यानं अद्यापही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.